Suyash Tilak Akshaya Deodhar Breakup : लोकप्रिय मराठमोळा अभिनेता सुयश टिळक (Suyash Tilak) हा त्याच्या 'का रे दुरावा' या मालिकेसाठी ओळखला जातो. फक्त ही एकच मालिका नाही तर त्यानं आजवर अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. नेहमीच त्याच्या प्रोफेशन्ल लाइफमुळे चर्चेत असणारा सुयश आज त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. काही वर्षांपूर्वी सुयश आणि 'तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेत्री अक्षया देवधर (Akshaya Deodhar) हे रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, त्यांच्यात काही गोष्टी चांगल्या प्रकारे सुरु नव्हत्या आणि त्यामुळे त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. आता ते दोघेही त्यांच्या आयुष्यात पुढे वळले आहेत. दरम्यान, सुयशनं एका मुलाखतीत त्यांच्या रिलेशनशिपवर वक्तव्य केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुयशनं ‘प्लॅनेट मराठी’च्या ‘त्या नंतर सगळं बदललं’ या कार्यक्रमात याविषयी वक्तव्य केलं आहे. अक्षया आणि सुयश खूप चांगले मित्र होते. इतकंच काय तर जेव्हा तिच्या आयुष्यात कोणी येत आहे हे तिला जाणवलं तेव्हा तिनं लगेच सुयशला सांगितलं होतं. दरम्यान, जेव्हा सुयश आणि अक्षयाचा ब्रेकअप झाला होता. तेव्हा त्याची परिस्थिती कशी होती याविषयी सुयशनं सांगितलं आहे.



जेव्हा त्या दोघांचा ब्रेकअप झाला तेव्हा त्याचा परिणाम हा सुयशच्या मानसिक आरोग्यावर झाला होता. 'आपली माणसं जेव्हा आपल्यापासून दूर जातात तेव्हा त्या परिस्थितीला सामोरं जाणं कठीण असतं. ब्रेकअपनंतर आम्ही विभक्त झालो आहोत हे स्वीकारणं फार कठीण होतं. माझ्या मानसिक आरोग्यावर याचा परिणाम झाला होता. मी अनेक गोष्टी केल्या. कुठेतरी मी एकटाच निघून जायचो. माझ्या जवळच्या लोकांना फक्त सांगायचो की पुढचे काही दिवस मी एका ठिकाणी जाणार आहे', असं सुयश म्हणाला. 


हेही वाचा : इतक्या वर्षांनंतर Salman Khan च्या लग्नाच्या प्रपोजलवर जुही चावलाचं वक्तव्य, म्हणाली 'आजही तो...'



या सगळ्याचा सुयशच्या कामावरही परिणाम होऊ लागला होता. तो कोणतीही भूमिका उत्तमरित्या साकारू शकत नव्हता. त्यामुळे त्यानं ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. पुढे याविषयी बोलताना सुयश म्हणाला, 'मी खूप फिरायचो , फोन बंद ठेवायचो. त्यानंतर मी काम करणंही कमी केलं होतं. कारण मला काम करता येत नव्हतं. जेव्हा तुम्ही भावनिकदृष्ट्या खचता तेव्हा तुम्ही जी भूमिका साकारत आहात. तेव्हा ती उत्तमरित्या साकारता येत नाही. त्यामुळे मी स्वत: ला वेळ दिला. मी खूप फिरलो. सोलो ट्रीप केल्या. तर एक माणूस म्हणून मी स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न केला. वाचण करू लागलो.