नवी दिल्ली : 'सेल्फी मैने ले ली आज' हे गाणं युट्यूबवर व्हायरल झाल्यानंतर ढिंचॅक पूजा ही चर्चेत आली. सध्या ती 'बिग बॉस' या रिअॅलिटी शो ची कंटेस्टंट आहे. पण 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 'बिग बॉस'चे एक्स-कंटेस्टंट असलेल्या स्वामी ओमने तिच्यावर आरोप केले आहेत.  'सेल्फी मैने ले ली आज' हे व्हायरल झालेल्या गाण्याचे शब्द ढिंचॅक पूजाने लिहिले नसून मी लिहिल्याचे स्वामी यांनी सांगितले. 


एका  वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत या गाणे आपणच लिहिल्याचा दावा स्वामी ओम यांनी केला आहे. या मुलाखतीत स्वामी ओम यांना विचारलेल्या अनेक प्रश्नांमध्ये ढिंचॅक पूजाविषयीदेखील विचारण्यात आले. एवढच नव्हे तर ढिंचॅक पूजा ही फेमस कलाकार बनू इच्छित होती आणि यासाठी ती माझ्याकडे आशीर्वाद घेण्यासाठी आली होती असेही स्वामी यांनी सांगितले. त्यानंतर ढिंचॅक पूजासाठी मी हे गाणे लिहिल्याचा दावा त्यांनी केला आहे.
ढिंचॅक पूजा सध्या बिग बॉसच्या घरात असून स्वामींच्या या दाव्यावर ती काय प्रतिक्रीया देते हे पाहणे मजेशीर ठरणार आहे. 


ढिंचॅक पूजाच्या 'स्वॅग वाली टोपी' आणि 'दिलो का शूटर' या गाण्याचे व्हिडिओही  त्यानंतर व्हायरल झाले होते. सूर, ताल, स्वराचा मेळ नसलेल्या तिच्या गाण्यांवर नेहमी टीका होत असते. पण स्वामींनी स्वत: हूनच हे गाणे आपले असल्याचे सांगत वादाला तोंड फोडले आहे.