Swanandi Tikekar Love Story: सध्या प्रेमाचे वारे वाहू लागले आहे, असे दिसते आहे कारण गेल्या काही दिवसांमध्ये सेलिब्रेटी आपल्या प्रेमाची कबुली दिताना दिसत आहेत. आपले आवडते कलाकार आता आयुष्यात पुढे जाऊ लागले आहेत आणि आपल्या आयुष्याचा जोडीदारही शोधत आहेत आणि आपलं नातं जाहीर करत आहेत. अगदी काही दिवसांपुर्वी चर्चा होती ती म्हणजे 'सारेगमपमधील लिटिल चॅप्म्स'च्या प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन ह्यांची. इन्टाग्रामवर आजकाल सगळेच सक्रिय असतात. त्यामुळे सेलिब्रेटींच्या पर्सनल लाईफबद्दलही ते कायमच आपल्या इन्टाग्राम अकांऊटवरून पोस्ट करताना दिसतात. त्याचप्रमाणे प्रथमेश आणि मुग्धानं आपल्या रिलेशनशिपबद्दल इन्टाग्रामवरून जाहीर कबुली दिली. त्यानंतर अनेक दिवस त्यांच्या चर्चा या सुरू होतात. मुग्धानं आपल्या युट्युबवरूनही व्हिडीओमधून आपल्या आणि प्रथमेशच्या नात्यावर भाष्य केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता अशाच एका लोकप्रिय अभिनेत्रीची सध्या चर्चा आहे. 'दिल दोस्ती दुनियादारी' ही मालिका आपण सर्वांनीच पाहिली असेलच. या मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री हिनं आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. ज्येष्ठ अभिनेते उदय टिकेकर यांची लेक स्वानंदी टिकेकर हिनं काही तासांपुर्वी आपलं आणि मराठमोळा गायक आशिष कुलकर्णी याच्यासोबत आपल्या रिलेशनशिपची कबुली दिली असून ते दोघं लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या या घोषणेनंतर मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गजांनी आणि त्यांच्या मित्रपरिवारानं त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे त्यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. एकमेकांसोबतच फोटो शेअर करत स्वानंदीनं This is US असं म्हटलं आहे आणि सोबतच खाली #love #amachatharlay असे हॅशटॅग्स दिले आहेत. 


हेही वाचा - 'टिप टिप बरसा पानी' गाण्यात रवीना नाही तर ही अभिनेत्री होती पहिली पसंद, पण तिचं अकाली निधन झालं


स्वानंदी ही ज्येष्ठ अभिनेते उदय टिकेकर आणि शास्त्रीय संगीत गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांची कन्या आहे. तिची 'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेतील मीनल हे भुमिका चांगलीच लोकप्रिय झाली होती. तिनं 'सिगिंग स्टार' या गाण्याच्या रिएलिटी शोमधून भाग घेतला होता आणि विजेतपदही मिळवले होते. त्यानंतर तिनं 'इंडियन आयडॉल मराठी' या रिएलिटी शोचे सुत्रसंचालनही केले होते. 



कोण आहे आशिष कुलकर्णी? 


2008 साली त्यानं 'सारेगमप लिटिल चॅम्प्स'मध्ये भाग घेतला होता. 2015 साली त्यानं आपल्या मित्रांसोबत 'रॅगलॉजिक' नावाचा बॅंड काढला. त्यानं 2020 साली इंडियन आयडॉल सीझन 12 मध्ये भाग घेतला होता. सोबत त्यानं अनेक लोकप्रिय म्युझिक बॅंण्डसोबत काम केलं आहे.