Prasad Oak- Swapnil Joshi : मराठमोळा अभिनेता स्वप्नील जोशी आणि प्रसाद ओक यांनी आपल्या मिश्किल स्वभावाने मनोरंजनाचा गोडवा कायमच वाढवला आहे. सध्या, हे दोघंही  ‘जिलबी’ चा मनमुराद आस्वाद घेत तिचा गोडवा चाखतायेत. शूटिंग दरम्यान ‘कुछ मिठा हो जाये’ म्हणत या दोघांनी जिलबीवर येथेच्छ ताव मारला आणि हो ... ही ‘जिलबी’ ते प्रेक्षकांनाही देणार आहेत. आनंद पंडित मोशन पिक्चर यांची निर्मिती असलेला ‘जिलबी’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु आहे. या चित्रीकरणाच्या वेळी धमाल जिलबीचा आस्वाद घेण्याचा मस्त बेत या दोघांनी नुकताच केला. केवळ प्लॅन करून हे दोघे थांबले नाहीत तर  चित्रपटाच्या प्रसिद्धीसासाठी एक मजेशीर व्हिडिओ ही या दोघांनी बनवला. या व्हिडिओमध्ये चित्रपटाचे दिग्दर्शक नितीन कांबळे ही या दोघांची फिरकी घेतायेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्वप्नील आणि प्रसाद हे दोघंही ‘जिलबी’ चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहेत. दोन गोड माणसं एकत्र आल्यावर चित्रपटाचा ‘गोडवा’ नक्कीच वाढणार असं दिग्दर्शक नितीन कांबळे सांगतात. रसिक प्रेक्षकांचा आनंद द्विगुणीत करायला चांगला विषय प्रेक्षकांसाठी घेऊन येत असल्याचे निर्माते आनंद पंडित यांनी सांगितले. त्याचा व्हिडीओ प्रसाद ओक यांनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत ते दोघेही दिग्दर्शकासोबत जिलबी खाताना दिसत आहेत. त्याचे वेगवेगळे फोटो चांगले व्हायरल होत आहेत. व्हिडीओ विषयी बोलायचे झाले तर व्हिडीओच्या सुरुवातीला प्रसाद त्याचं तोंड भाजत असल्याचे अॅक्शन करताना दिसतो. तर दुसरीकडे स्वप्नील समोरून येतो. यावेळी स्वप्नील आणि प्रसाद यांच्यातील जुगलबंदी पाहायला मिळते. त्यानंतर स्वप्नील त्यांच्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाला बोलावतो. त्यानंतर ते दोघे त्यांच्या दिग्दर्शकाला जिलबी भरवत चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाल्याची घोषणा करताना दिसतात.


हेही वाचा : 'जवान'चा लेखक सुमित अरोरासाठी 2023 वर्ष ठरलं ब्लॉकबस्टर!


या दोघांसोबत ‘जिलबी’ या चित्रपटात शिवानी सुर्वे, पर्ण पेठे, गणेश यादव, प्रणव रावराणे,अश्विनी चावरे, प्रियांका भट्टाचार्य या कलाकारांच्या भूमिका आहेत. कथा-पटकथा-संवाद मच्छिंद्र बुगडे यांचे आहेत. छायांकन गणेश उतेकर यांचे आहे. कलादिग्दर्शन कौशलसिंग यांचे असून क्रिएटिव्ह दिग्दर्शन राहुल व्ही.दुबे यांचे आहे. रूपा पंडित आणि  राहुल व्ही.दुबे सहनिर्माते असून कार्यकारी निर्माते महेश चाबुकस्वार आहेत.