व्हाट्सऍप ग्रुपवर स्वरा भास्करच्या आई-वडिलांचं फ्लर्ट; स्वरा म्हणाली ....
स्वरा भस्करने तिच्या आई-वडिलांबद्दल एक मोठा केला खुलासा .
मुंबई : अभिनेत्री स्वरा भस्करने तिच्या आई-वडिलांबद्दल एक मोठा खुलासा केला. स्वराने व्हाट्सऍप ग्रुपवरील तिच्या आई-वडिलांच्या चॅटचा स्क्रिनशॉट काढून सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. सर्वात आधी स्वराच्या वडिलांनी तिच्या आईला व्हईस मेसेज पाठवला. सध्या स्वराची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
आई-वडिलांच्या चॅटचा फोटो पोस्ट करत स्वराने 'कृपाकरून स्वतःच्या चॅटबॉक्सच्या माध्यमातून फ्लर्ट करा...' असा मेसेज केला आहे. शिवाय तिने रागाचा इमोजी देखील चॅटमध्ये टाकला आहे. तिने चॅटचा फोटो ट्विटरवर देखील पोस्ट केला आहे. 'वेळ पूर्णपणे अंधाराने भरली आहे. पण आई-वडिलांसोबत चॅट कायम मजेशीर असतं...' असं स्वराने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.
स्वराच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 'रांझणा', 'तनु वेड्स मनु', 'निल बटे सन्नाटा' आणि 'वीरे दी वेडिंग' या चित्रपटांसह तिने वेब सीरिजमध्ये देखील काम केलं आहे. 'रसभरी', 'फ्लेश', 'भाग बीनी भाग', 'आपके कमरे में कोई रहता है' या सीरिजच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आली.