माझ्यावर झालेल्या अत्याचारा बद्दल मला सहा-सात वर्षांनंतर कळाले-स्वरा भास्कर
स्वराने पुन्हा एकदा #MeToo च्या माध्यमातून लैंगिक अत्याचाराविरोधात आपली भूमिका स्पष्ट केली.
मुंबई:अमेरीकेमध्ये नावारुपाला आलेली #Me Too मोहीम भारतात मोठ्या प्रमाणात गाजत आहे.#Me Too मोहीमे अंतर्गत अनेक महिलांनी आपल्या वर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली.#Me Too हे वादळ अद्यापही शमलेले नाही. 'वीरे दी वेडिंग' सिनेमाच्या माध्यमातून प्रकाश झोतात आलेली अभिनेत्री स्वरा भास्करने तिच्यावर झालेल्या अत्याचारा बद्दल सांगितले. एका दिग्दर्शकावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. एका कार्यक्रमात स्वराने पुन्हा एकदा #MeToo च्या माध्यमातून लैंगिक अत्याचाराविरोधात आपली भूमिका स्पष्ट केली.
एका दिग्दर्शकाने मला चुकीच्या पध्दतीने स्पर्श केल्याचा आरोप स्वराने केला.ही घटना बऱ्याच वर्षांपूर्वीची आहे. #Me Too मोहीमे अंतर्गत महिला आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फो़डत आहेत. यामुळे अनेक राजकारणी,दिग्दर्शक, अभिनेते यांचे पितळ उघडे पडले आहे. माझ्यावर झालेल्या अत्याचारा बद्दल मला सहा-सात वर्षांनंतर कळाले. असे अभिनेत्री स्वरा भास्कर म्हणाली.पण स्वराने त्या दिग्दर्शकाचे नाव गुपित ठेवले आहे.मुलींना त्यांच्यावर होत असलेल्या लैंगिक अत्याचार कसे ओळखावे,त्याची जाणीव याबाबत आपल्या देशात कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शन केले जात नाही. याबाबत मार्गदर्शन केल्यास मुली त्यांच्यावर होत असलेल्या अत्याचाराला बळी पडणार नहित.
नुकताच राणी मुखर्जीच्या झालेल्या मुलाखतीत सांगितले प्रत्येक महिलेने मनातून मजबूत झाले पाहिजे. प्रत्येक मुलीला मार्शल आर्ट यायला हवे. स्वतःला इतक मजबूत करा की कोणत्याही परिस्थित अडकल्यावर परिस्थितीचा हिमतीने सामना करता यायला हवा.महिलांनी स्वतःच स्वतःचीच जबाबदारी घ्यायला लागेल.
राणीच्या या वक्तव्यावर दीपिका पादुकोण म्हणाली,' बऱ्याच महिला शारीरिक दृष्ट्या मजबूत नसतात त्या स्वतःचीच सुरक्षा करू शकत नाही. अशा घटना लहान मुलींसोबत होतात'.