मुंबई : दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून मराठी इंडस्ट्रीला नवे आणि फ्रेश असे चेहरे मिळाले. या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आशू, अॅना, रेश्मा, मीनल, सुजय, कैवल्य ही पात्रे आजही लोकांच्या तितकीच लक्षात आहेत. यातील धाकड गर्लचे पात्र मीनल म्हणजेच स्वानंदी टिकेकरने साकारलं होतं. बेधडक, बिनधास्त गर्ल अशी तिची या मालिकेतून ओळख बनवली होती.


स्वानंदीने नुकताच इन्स्टाग्रामवर एक फोटो अपलोड केलाय. आतापर्यंत अनेकदा रावडी लूकमध्ये दिसणारा तिचा लूक पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. साडीतील सोज्वळ लूकमधील तिने फोटो शेअर करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच दिलाय.




यात स्वानंदीने पिवळ्या रंगाची साडी नेसलीये. या साडीला गुलाबी रंगाचा बारीक काठ आहे. साडीमध्ये स्वानंदीचा अतिशय सुंदर दिसतेय.