मुंबई : अमिताभ बच्चन सध्या हैदराबादमध्ये चिरंजीवीचा सिनेमा 'सई रा नरसिंहा रेड्डी' च्या शूटमध्ये व्यस्त आहे. नुकतेच आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून त्यांनी आपल्या सिनेमातील लूकचे फोटोस शेयर केले. 'सई रा नरसिंहा रेड्डी' चिरंजीवी गरुसोबत काम करण्याचा गर्व आणि मजा,' असे या पोस्टवर लिहिले. यानंतर बिग बी ने काही फोटो शेयर करत लिहिले, निर्वाण आणि हिमालय 'का बुलावा.' या फोटोमध्ये अमिताभयाच्या माथ्यावर एखाद्या ब्राम्हणाप्रमाणे टीळा लावलेला आहे.याचसोबत त्यांचे केसही सफेद आहेत.


पाहुणा कलाकार 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 माझ्या प्रिय मित्र, आंध्र आणि तेलगु सिनेमातील सुपरस्टार चीरंजीवींच्या पिरयड ड्रामा सिनेमात पाहुणा कलाकार म्हणून याव अशी त्यांची इच्छा होती.



या शूटसाठी मी हैदराबादला चाललोय असे अमिताभ यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले सुरेंदर रेड्डी या सिनेमाचे दिग्दर्शन करत आहेत. स्वातंत्र्य सेनानी उय्यलावडा नरसिंहा रेड्डी यांच्यावर आधारित हा सिनेमा आहे. त्याव्यतिरिक्त अमिताभ हे सध्या  'ठग्ज ऑफ हिंदुस्तान' आणि '१०२ नॉट आऊट' वर देखील काम करत आहेत.