तापसीचा `हा` फोटो पाहून यूझर्स म्हणतायेत `हायब्रीड हो क्या?`
बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूची स्टाईल संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूची स्टाईल संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. ती प्रत्येक काम अतिशय वेगळ्या स्टाईलमध्ये करण्यासाठी प्रसिध्द आहे. सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असलेल्या तापसीने नुकताच इन्स्टाग्रामवर तिचा एक लेटेस्ट फोटो शेअर केला आहे, या फोटोमुळे ती ,सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. या फोटोत तापसी पन्नू साडी-ब्लाउजसह स्पोर्ट शूज परिधान करताना दिसत आहे.
कसा आहे तापसीचा आऊटफिट
रॉयल ब्लू रंगाचा ब्लाउज आणि गोल्डन-व्हाइट कलरची साडी याबरोबर तापसी पन्नूने सनग्लासेस परिधान केले आहेत. या आऊटफिटवर तापसीने केसांचा आंबाडा घातला आहे. त्याचबरोबर स्पोर्ट शूज परिधान केले आहेत. हा आऊटफिट परिधान करुन या अनोख्या अंदाजात ती झेब्रा क्रॉसिंग रोड क्रॉस करताना दिसत आहे. तापसी पन्नूचा हा इंस्टाग्रामवर व्हायरल होत आहे. काहिच वेळात या फोटोला 3 लाखाहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
काय आहेत फँन्सच्या रिएक्शन?
या फोटोला फँन्स भरपूर पसंदी देत आहेत. बऱ्याच यूजर्स हार्ट, फायर आणि किसींगवाले इमोजी शेअर करत आपले फीलिंग्स एक्सप्रेस केले आहेत. तापसी हा लूक हटके वाटत आहे. तर एका यूजरने कमेंन्ट सेक्शन मध्ये लिहीलं आहे की, अरे वाह, भारतीय नारी आ गई. तर दुसरीकडे एका युजर्सने लिहिलं आहे की, हायब्रिड हो क्या? तर एकाने कमेंन्ट केली आहे की, अरे ये क्या कर लिया आपने?
अशा अनेक कमेंन्ट तापसी पन्नूच्या फोटोवर आल्या आहेत. तप्पसी पन्नू, इंडस्ट्रीतील अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जिने फारच कमी वेळात आपलं स्थान बनवलं आहे. हिंदी सिनेसृष्टीत तापसीच्या कारकिर्दीची सुरूवात चश्मे बद्दूर या चित्रपटाने झाली. यापूर्वी तिने तमिळ, तेलगू आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम केलं होतं.