Haseen Dillruba Trailer : ``बायोडेटावर सर्वगुणसंपन्न लिहिलेल्या मुलीला ``भाज्या`` बनवता येत नाहीत``, ``मग तुमच्या मुलाला तर...``
हर्षवर्धन राणे तपसीच्या प्रियकराच्या भूमिकेत दिसतात आहे. या दोघांमध्ये अनेक लव मेकिंग सीन दाखवले गेले आहेत.
मुंबई : तापसी पन्नू, विक्रांत मैस्सी आणि हर्षवर्धन राणे यांच्या हसीन दिलरुबा या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. चित्रपटाचे पोस्टर आणि टीझर पाहिल्यानंतर चाहते या चित्रपटाची आणि त्यांच्या ट्रेलरची उत्सुकतेने वाट पाहत होते. परंतु आता चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर पाहिल्यानंतर लोकांमध्ये हा चित्रपट पाहाण्याची उत्सूक्ता निर्माण झाली आहे.
ट्रेलरच्या सुरूवातीला तप्पसी पन्नूने विक्रांत मैस्सीला विचारते की, "तुम्ही दिनेश पंडित यांचे पुस्तक वाचले आहे का? ज्यांनी एका पुस्तकात लिहिले आहे की, छोट्या-छोट्या शहरांमध्ये मोठे-मोठ्या हत्या केल्या जातात." यानंतर तापसीच्या घरात स्फोट होते ज्यात विक्रांतचा मृत्यू होतो. यानंतर पोलिस तापसीचा चौकशी करतात, ज्यात तिच्या आयुष्याती वेगवगळे सत्य समोर येते.
हर्षवर्धन राणे तापसीच्या प्रियकराच्या भूमिकेत दिसतात आहे. या दोघांमध्ये अनेक लव मेकिंग सीन दाखवले गेले आहेत. हसीन दिलरुबा सस्पेन्स आणि थ्रिलरने परिपूर्ण आसा चित्रपट आहे. तसेच त्यातील डायलॉग खूपच विचार करुन आणि बारकाईने लिहिलेले आहेत. त्यात तापसीच्या जबरदस्त आभिनयाने या चित्रपटाला वेगळ्याच उंचीवर घेऊन गेले आहे.
हसीन दिलरूबा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलिज होणार होता. परंतु नंतर चित्रपटाच्या मेकर्सनी याला OTT प्लॅटफॉर्मवरती रिलिज करण्याचा निर्णय घेतला आहे. हा चित्रपट 2 जुलैला OTT प्लॅटफॉर्मवरती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
चित्रपटाच्या कथेबद्दल बोललायचे झाले तर हा एक मर्डर मिस्ट्री चित्रपट आहे. ज्यात एका जोडप्या म्हणजेच तापसी आणि विक्रांतची कथा दाखविली जाते, परंतु हर्षवर्धनच्या एन्ट्रीनंतर त्यांच्या कथेत एक ट्विस्ट येतो. असे म्हटले जाते की, आतापर्यंत अशा प्रकारच्या कोणत्याही कथेवर चित्रपट बनला गेलेला नाही. प्रेक्षकांसाठी हा नवा अनुभव असणार आहे.
या चित्रपटाला विनिल मैथ्यू यांने डायरेक्ट केले आहे. तर आनंद एल राय यांनी त्यांच्या कलर यलो प्रॉडक्शनच्या बॅनरखाली याला प्रोड्यूस केले आहे. या हत्येच्या रहस्येविषयी बोलताना विनील म्हणाला, "मला नेहमी अशा कथांवर काम करण्याची इच्छा होती ज्यात मानवी स्वभावाची अनेक आवृत्ती दर्शविली जाईल. हसीन दिलरुबा ही कनिका ढिल्लन यांनी सुंदरपणे लिहिली आहे."