मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा प्रत्येक घरातला आवडता शो आहे. हा शो 13 वर्षांपासून लोकांचे मनोरंजन करत आहे. या शोच्या सर्व कलाकारांनी लोकांच्या हृदयात आपले विशेष स्थान निर्माण केले आहे. 
'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये एक मोठी स्टारकास्ट आहे आणि प्रत्येकजण सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चाहते दररोज सोशल मीडियावर त्यांच्याबद्दल काहीतरी नवीन शोधतात. अशा परिस्थितीत शोच्या महत्वाच्या पात्राशी संबंधित एक माहिती समोर आली आहे. हे पात्र दुसरे कोणी नाही तर बबिता जी म्हणजेच मुनमुन दत्ता आहे.


मुनमुन राजला करतेय डेट


 'तारक मेहता का उल्टा चष्मा'ची मोठी प्रेमकथा आता सर्वांसमोर आली आहे. एका वेबसाईटच्या अहवालानुसार, मुनमुन दत्ता म्हणजेच बबिता जी एका व्यक्तीला डेट करत आहेत. ही व्यक्ती म्हणजे राज अनादकत आहे.
दोघेही आजकाल एकमेकांच्या प्रेमात मग्न आहेत. बऱ्याच काळापासून, राज आणि मुनमुन दत्ताच्या इन्स्टाग्राम पोस्ट आणि कमेंड याकडे निर्देश करत होत्या. सोशल मीडिया नेटकऱ्यांना अनेकदा मुनमुनच्या फोटोंवर राज यांच्या प्रतिक्रिया दिसल्या. आता हे स्पष्ट झाले आहे की दोघेही चांगल्या मित्रांपेक्षा जवळ आहेत.


राज आणि मुनमुनचे नाते कुटुंबातील सदस्यांना माहीत 


 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या टीममधील प्रत्येक सदस्याला दोघांमध्ये काय चालले आहे याची जाणीव आहे. या प्रकरणाशी संबंधित एक सूत्र म्हणतो, 'मुनमुन दत्ता आणि राज अनादकट यांच्या कुटुंबीयांनाही सर्वकाही माहीत आहे, कोणीही अंधारात नाही.'