Taarak Mehta... Fame Gurucharan Singh Missing Case New Update : ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. गेल्या 4 दिवसांपासून या तो बेपत्ता असून या बातमीनं सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे. तो दिल्लीहून मुंबईला जाण्यासाठी निघाला मात्र, मध्येच तो बेपत्ता झाला. या प्रकरणात त्याच्या वडिलांनी पोलिसात तक्रार केली आहे. आता या सगळ्यात एक मोठी अपडेट समोर आली आहे. ही अपडेट गुरुचरणचा मित्र अभिनेता आणि निर्माता मजीठिया यांनी दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेता आणि निर्माता मजीठियानं ईटाइम्सला नुकतीच एक मुलाखत दिली. यावेळी गुरुचरण विषयी अपडेट देताना त्यानं सांगितलं की "गुरूचरण हा दिल्लीहून मुंबईला येण्यासाठी 22 एप्रिलला घरातून निघाला होता. मात्र, तो मुंबईला पोहोचलाच नाही आणि दिल्लीत असलेल्या घरी देखील परत गेला नाही.  आमची एक फॅमिली फ्रेंड आहे भक्तनी सोनी, ती त्याला विमानतळावर घ्यायला गेली होती. पण तो तिला तिथे भेटलाच नाही. जेव्हा तिनं या प्रकरणी विमानतळावर असलेल्या सहकाऱ्यांकडे याविषयी विचारणा केली, तेव्हा तिला समजलं की गुरुचरण हा विमानात बसलाच नव्हता. तर दुसरीकडे गुरुचरणनं विमानत बसण्याआधी भक्तीला मेसेज केला होता की तो विमानात बसणार आहे. या सगळ्यात गुरुचरण कुठे गेला? मी मीटिंगमध्ये होतो त्यावेळी मला भक्तीनं फोन करुन याविषयी सांगितलं." 


दरम्यान, गुरुचरण सिंगच्या वडिलांनी पोलिसात जी तक्रार केली आहे. त्याविषयी देखील माहिती समोर आली आहे. 'ईटाइम्स'नं दिलेल्या रिपोर्ट्सनुसार, पोलिसांत दिलेल्या तक्रारीत काय म्हटलं आहे त्याच्या रिपोर्टमध्ये असं लिहिलं आहे की 'माझा मुलगा गुरुचरण सिंग, वय: 50 वर्ष, 22 एप्रिल रोजी सकाळी 8.30 वाजता मुंबईला जाण्यासाठी निघाला होता. तर त्यासाठी फ्लाइटनं जाण्यासाठी तो दिल्ली एअरपोर्टला गेला होता. पण तो नाही मुंबईला पोहोचला नाही परत घरी परतला. त्याचा फोन देखील नाही आला. तो मानसिक रित्या स्थिर होता. आम्ही त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण तो बेपत्ता आहे.'


हेही वाचा : 'तारक मेहता…' चा प्रसिद्ध अभिनेता ‘सोढी’ बेपत्ता, वडिलांची पोलिसांत तक्रार

गुरुचरण सिंगनं त्याच्या वडिलांच्या आरोग्याचे कारण सांगत मालिकेला रामराम केला होता. गुरुचरणनं 2020 मध्येच ही मालिका सोडली होती. त्यानंतर तो कोणत्या मालिकेत दिसला नाही. त्याचं म्हणणं होतं की त्याला त्याचं संपूर्ण लक्ष हे कुटुंबाला द्यायचं आहे.