मुंबई : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका  'तारक मेहता का उल्टा चश्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah)'सर्वांच्या मनात घर केले आहे. प्रत्येक वयोगटातील व्यक्तींना मालिका फार जवळची आहे. मालिकेतील सर्वचं कलाकारांनी त्यांच्या अभिनयाने चाहत्यांचं मन जिंकलं आहे. त्यातली एक व्यक्तीरेखा म्हणजे मालिकेत रिपोर्टरची भूमिका  साकारणारी रिता म्हणजे अभिनेत्री प्रिया आहूजा (Priya Ahuja) प्रियाच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. 
 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सांगायचं झालं तर प्रिया सोशल मीडियावर कायम ऍक्टिव्ह असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ती फोटो आणि व्हिडिओ शअर करत असते. आता प्रियाने तिचे काही बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यामुळे तिली ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. प्रियाने फोटोमध्ये ब्राची स्ट्रीप दाखवली आहे. 



निळ्या रंगाच्या शर्टमध्ये फोटो शेअर करत प्रिया कॅप्शनमध्ये 'जे तुम्हाला योग्य वाटेल ते केलचं पाहिजे...' असं लिहिलं आहे. यामुळे तिला ट्रोल केलं जात आहे. सोशल मीडियावर ट्रोल होताचं तिच्या पतीने ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलं, 'तुमच्या आई, बहिणीला बोलून बघा... बघा काय प्रतिक्रिया देतात...' 


सांगायचं झालं तर प्रेग्नेंसीनंतर प्रिया मालिकेपासून दूर आहे. प्रियाने मालिकेचा दिग्दर्शक मालव राजदासोबत लग्न केलं आहे.