मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेने चाहत्याच्या मनात  घरात केलं आहे. मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या फार जवळचं झालं आहे. त्यामुळे कोणत्या कलाकाराच्या आयुष्यात काय चालू आहे. याची उत्सुकता तर चाहत्यांच्या मनात असतेचं, पण त्यांना काही कारणांमुळे ट्रोल देखील केलं जातं. बबिता ही भूमिका साकारणाऱ्या मुनमुन दत्ताने युट्यूब चॅनेलवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. व्हिडिओमध्ये बोलताना तिने जातीवाचक शब्द वापरल्यामुळे ट्विटरवर ट्रोल करण्यात आले. त्यानंतर तिने सोशल मीडियावरून एक माफीनामा पोस्ट केला आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


एवढचं नाही तर #ArrestMunmunDutta असा ट्रेंडही ट्विटरवर सुरू झाला होता. शिवाय नेटकऱ्यांकडून तिला अटक करण्याची मागणी देखील केली जात आहे. सोशल मीडिया आपल्याला ट्रोल केलं जात आहे. असं समजताचं मुनमुनने सोशल मीडियाच्या माध्यमातून माफीनामा पोस्ट केला आहे.



माफीनामा पोस्ट करत मुनमुन म्हणाली, 'मी वापरलेल्या शब्दाचा वेगळा अर्थ काढला जात आहे. माला कोणाच्या ही भावना दुखवायच्या नव्हत्या. मला त्या शब्दाचा  नेमका अर्थ माहिती नव्हता. मी प्रत्येक जात, पंथ आणि लिंगाच्या व्यक्तींचा आदर करते.  नकळत माझ्याकडून वापरल्या गेलेल्या शब्दासाठी मी मनापासून माफी मागते.'


मुनमुनच्या माफीनाम्यानंतर तिला  एक महिन्याची शिक्षा होवू शकते? अशी चर्चा रंगत आहे. दरम्यान मुनमुन एक युट्यूब चॅनेल ओपन करत आहे. त्यामुळे मला सुंदर दिसायचं आहे. असं ती व्हिडिओमध्ये म्हटली होती. तिच्या वक्तव्यानंतर युझर्स प्रचंड संतप्त झाले असून तिला अटक करण्याची मागणी सोशल मीडियावर केली.