मुंबई: तारक मेहतामधील बबिताचे फोटो पाहून सोशल मीडियावर चाहत्यांचा पारा वाढतो. मात्र बागाच्या गर्लफ्रेंडचे फोटो पाहिल्यानंतर तुम्ही बबितालाही विसरून जाल. 'तारक मेहता का उल्टा चश्मा' हा प्रत्येक घरातला आवडता शो आहे. हा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून लोक आवडीनं पाहात आहेत. या शोच्या सर्व कलाकारांनी लोकांच्या हृदयात आपले विशेष स्थान निर्माण केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता चाहत्यांनाही त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यात फार रस आहे. मग ती बबिता असो किंवा तारक मेहता असो किंवा बागासंदर्भातील अजून कोणती गोष्ट असो लोक सोशल मीडियावर या सेलिब्रेटिंना खूप फॉलो करत असतात.'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये जबरदस्त स्टारकास्ट आहे. यापैकी एक बागाची मैत्रीण बावरी म्हणजेच मोनिका भदौरिया होती. 


मोनिका जरी आता या शोमध्ये नसली तरीही बागाची गर्लफ्रेंड म्हणून अजूनही चाहत्यांमध्ये चर्चेत असते. याशिवाय तिच्या सौंदर्यासमोर बबितालाही चाहते विसरतात. आज मोनिकाच्या आयुष्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊया. 


तारक मेहतामधील खास भूमिका आणि लोकप्रियता


मोनिका भदौरियाने बागाची गर्लफ्रेंड बावरीची भूमिका केली होती. सध्या जरी ती या शोमध्ये नसली तरीही ज्यावेळी ती या सीरियलमध्ये होती तेव्हा तिची खूप चर्चा होती. तिच्या या भूमिकेला लोकांनीही भरभरून प्रेम दिलं. या शोमध्ये ती सारख्या चूका करत होती आणि जेठालाल तिच्यावर चिडत होता असं दाखवण्यात आलं होतं. 


बागाचं मन विचलित करण्यासाठी बावकीची भूमिका मोनिका भदौरिया करत होती. बागाचं कामावरील लक्ष विचलित करण्याकडे तिचा कल असायचा. तिच्या विनोदाचं टायमिंग देखील जबरदस्त होतं. तिची ही भूमिका सर्वांना आवडली होती. या शोमुळे मोनिकाला एक वेगळी ओळख मिळाली. 


शो सोडण्याचं काय कारण?


मोनिका 6 वर्ष या शोमध्ये काम करत होती. त्यानंतर काही वैयक्तीक कारणांमुळे तिने हा शो सोडण्याचा निर्णय घेतला. तिच्या शोमधून जाण्यामुळे चाहते खूप नाराज होते. आजही अनेक चाहत्या मोनिकाची आठवण काढतात. तिने या शोमध्ये परत यावं अशी अनेक चाहत्यांची इच्छा आहे. मात्र मोनिकाने त्यावेळी वैयक्तीक कारणांमुळे हा शो सोडत असल्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळाली होती. 


मोनिका सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. ती आपले खूप सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करते. तिच्या फोटोला चाहते देखील लाईक आणि कमेंट्स करून खूप चांगला प्रतिसाद देत असतात. तारक मेहतामधील बावरी आणि प्रत्यक्षातली मोनिकामध्ये खूप जास्त फरक आहे. राहण्यापासून सौंदर्यापर्यंत. तिचं सौंदर्य पाहून अनेकजण बबितालाही विसरतील. तिचं हे सौंदर्य चाहत्यांना घायाळ करणारं आहे. 



फिटनेसची अशी घेते काळजी


मोनिका आपल्या फिटनेसची खूप जास्त काळजी घेते. ती जिममध्ये देखील जाते. व्यायाम आणि आहार यावर तिचा भर जास्त असतो. जिममधील काही फोटो देखील तिने चाहत्यांसोबत शेअर केले होते. त्यावरून ती स्वत:ची किती काळजी घेत असावी याचा अंदाज येतो. ती उत्तम अभिनय तर करतेच पण त्यासोबत उत्तम चित्र देखील काढते. तिने सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी आपल्या पेंटिंगचा फोटो शेअर केला होता.


मोनिका आपल्या कुटुंबाच्या खूप जवळ आहे. तिला आपल्या कुटुंबासोबत क्वालिटी टाइम घालवायला खूप आवडतो. तिचं तिच्या आजीसोबत खास नातं आहे. आपल्या आजीची ती मन लावून सेवा करते. तिने नुकताच आजीला करत असलेल्या मालिशचा व्हिडीओ देखील पोस्ट केला होता. त्या व्हिडीओमध्ये मोनिका आजीच्या डोक्याला तेल लावत होती.