Disha Vakani Unknown Facts : तिचा संघर्ष तसा कमी नव्हता. थिएटरमधून अभिनयाला सुरुवात करणारी दिशा वाकानीला (Disha Vakani)बॉलीवूडमध्ये एन्ट्री करण्यासाठी B ग्रेड चित्रपटातही काम करावं लागलं. ऐश्वर्या राय बच्चनच्या 'जोधा अकबर'मध्येही ती दिसून आली. पण तिला खरी ओळख मिळाली ती म्हणजे 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील दयाबेन या भूमिकेने. ही दयाबेन या नावाने ती घरोघरी पोहोचली आणि ती आज चाहत्यांचा हृदयावर राज्य करत आहे. (Disha Vakani Birthday) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अहमदाबादमध्ये राहणाऱ्या गुजराती जैन कुटुंबात 17 ऑगस्ट 1978 ला तिचा जन्म झाला. आज तिच्या बर्थडे स्पेशलमध्ये आम्ही तिचा आयुष्यातील असे किस्से सांगणार आहात जे तुम्ही यापूर्वीही ऐकले नसतील. (taarak mehta ka ooltah chashmah dayaben disha vakani has throat cancer viral video disha vakani birthday special unknown facts)


थिएटर ते बी ग्रेड चित्रपटांपर्यंतचा प्रवास


गुजरात कॉलेजमधून नाट्यशास्त्रात पदवी घेतल्यानंतर दिशाने गुजराती थिएटरमध्ये कामाला सुरुवात केली. यानंतर तिची इंडस्ट्रीत स्थान मिळवण्यासाठी धडपड सुरु झाली खरी पण या संघर्षात तिला खूप मेहनत करावी लागली. अगदी करिअरच्या सुरुवातीला तिला बी ग्रेड चित्रपटांमध्ये कामं करावे लागले. 1997 मधील कमसिन: द अनटच्ड या चित्रपटामधून दिशाने एक बोल्ड सीन करुन आपल्या करिअरला सुरुवात केली. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


'या' भूमिकेतून ओळख


अखेर तिने बी ग्रेड चित्रपटांशी संबंध तोडला आणि  दिशाने टीव्हीकडे आपली वाटचाल सुरु केली. मग ती शुभ मंगल सावधान, खिचडी, झटपट खिचडी, हीरो भक्ती ही शक्ती है आणि आहत इत्यादी टीव्ही शोमध्ये ती झळकली. ती सीआयडीमध्येही दिसली होती. पण तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेने दिशाला प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचवलं. 


2015 मध्ये लग्नानंतर बाळंतपणासाठी 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधून ब्रेक घेतला आणि अजूनही चाहते तिची वाट पाहत आहेत. पण याकाळात तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यामध्ये ती रडताना दिसत होती आणि त्याचा हातात एक मुलं होतं. या व्हिडीओमध्ये ती हलाखीची परिस्थिती जगतेय तिच्याकडे पैसे नाही.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


व्हिडीओमागील सत्य


खरं तर हा व्हिडीओ फेक होता. 2008 मध्ये आलेल्या तुषार कपूर स्टारर 'सी कंपनी' या चित्रपटातील हा सीन होता जो पुन्हा सत्य म्हणून व्हायरल झाला होता. 


हेसुद्धा वाचा - सेलिब्रिटी कुटुंबातील 'या' हसऱ्या मुलाचा आज 53 वा वाढदिवस! तब्बल 12 वर्षांनी मोठ्या मुलीशी लग्न आणि...


दिशा वाकाणीला घशाचा कर्करोग?


त्याच वेळी, शो सोडल्यानंतर काही दिवसांनी, त्यांच्याबद्दल आणखी एक बातमी धक्कादायक समोर आली.  दिशाला घशाचा कर्करोग झाल्याचं बोलं जातं होतं. कॅन्सरवर उपचार घेण्यासाठी तिने मालिका सोडली होती. इतकंच नाही तर दिशा वाकानी घशाचा कर्करोग करून गुगलवर सर्चही मोठ्या प्रमाणात होत होता. पण ही बातमी फेक असल्याचं समोर आलं.