Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Disha Vakani : भारतीय टेलिव्हिजनची सर्वात लोकप्रिय मालिका तारक मेहता का उल्टा चष्माच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. दयाबेनची घरवापसी होणार असल्याची चर्चा इंटरनेटवर रंगली आहे. मालिकेच्या नवीन एपिसोडच्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तारक मेहता का उल्टा चष्मा (TMKOC) च्या निर्मात्यांनी दयाबेन लवकरच अहमदाबादहून मुंबईला परतणार आहे, असे संकेत दिले आहेत. होय... दयाबेन गोकुळधामला परतणार...(Taarak Mehta Ka Ooltah Chashmah dayaben Disha Vakani returning to show after 6 years confirmed video viral )


कधी परतणार दयाबेन?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवीन एपिसोडमध्ये जेठालाल आणि दयाचा भाऊ सुंदरलाल यांच्यामधील संभाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात सुंदरलालने दयाबेनच्या आगमनाचे संकेत देण्यात आले आहे. 



जेठालाल आणि सुंदरलाल यांनी दयाबेन नवरात्री किंवा दिवाळीला मुंबईला परत असं उघड केलं आहे. तारक मेहता का उल्टा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) चा लेटेस्ट ट्रॅकमध्ये जेठालाल सुंदरला गोकुळधाममध्ये बोलण्यासाठी सोसायटीमधील सगळ्यांसोबत प्लानिंग करताना दिसत आहे. 



जेठालाल सुंदरलाल समोर असं चित्र उभं करतो की, जेठालाल दया बेनच्या अनुपस्थितीत दुसऱ्या लग्नाच्या तयारीत आहे. पण सुंदरलाल हुशार त्याला जेठालाल असं का करतोय हे लक्षात आलं आहे. 


तोही जेठालालची मजा घ्यायला सुरु करतो. पण त्यानंतर सुंदरलालने स्पष्ट केलं आहे की, दयाबेन नवरात्री किंवा दिवाळीपर्यंत अहमदाबादहून मुंबईला येणार आहे.  दयाबेनच्या पुनरागमनासोबतच ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या दिशा वाकाणीच्या पुनरागमनाच्याही आशा निर्माण झाल्यामुळे चाहत्यांमध्ये खूष आहेत. 



दया बेनची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी हिने 2017 मध्ये मॅटर्निटी ब्रेकवर गेली होती. त्यानंतर ती परत शोमध्ये दिसली नाही. त्यामुळे दयाबेनचे चाहत्ये नाराज झाले आहे. पण आता लवकरत दिशा वकानी शोमध्ये दिसणार आहे. 6 वर्षांनंतर दिशा वकानी म्हणजे दयाबेन काय कमाल दाखवणार हे पाहण्यासाठी चाहते औत्सुक आहेत.