मुंबई : सब टीव्हीचा कॉमेडी शो 'तारक मेहता का उल्टा चश्मा' हा घराघरात पोहोचला आहे. या शोमधील प्रत्येक व्यक्तीरेखेचं आपला एक फॅन फॉलोइंग आहे. मग तो जेठालाल असू दे किंवा, सोनू किंवा मग बिता जी. या सगळ्यांनीच आपल्या अभिनयाने लोकांना भूरळ पाडली आहे. त्यात बबिता जीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ताने आपल्या अभिनयाने आणि आपल्या अदांनी प्रसिद्धी मिळवली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुनमुन दत्ताने झी टीव्हीच्या 'हम सब बाराती' या मालिकेतून पदार्पण केले, पण सब टीव्हीच्या तारक मेहता का उल्टा चष्मा या कॉमेडी शोमधून तिला ओळख मिळाली. या मालिकेनंतर ती लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत सामील झाली.


बातम्यांनुसार, मुनमुन सध्या 'तारक मेहता...' या मालिकेत टप्पूची भूमिका करणाऱ्या राज अनाडकटसोबतच्या तिच्या नात्यामुळे चर्चेत आहे. मात्र, दोघांनीही यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण राजच्या आधी तिने एका बॉलिवूड अभिनेत्याला डेट केले होते. 


खरंतर तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, या अभिनेत्रीने आपल्या अदांनी बॉलिवूड अभिनेत्यालाही वेड लावलं होतं, परंतु दोघांच्या प्रेमकथेचा शेवट खूप वेदनादायी होता.



मुनमुन दत्ता 2008 मध्ये अरमान कोहलीच्या जवळ आली होती. ते दोघेही एकमेकांना डेट करत होते. पण हे नाते फार काळ टिकू शकले नाही. अरमान कोहलीचा संतप्त स्वभाव दोघांच्या नात्यामध्ये आला. ज्यानंतर मुनमुनने त्याच्यावर मारहाणीचा आरोपही केला होता


व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी मुनमुन दत्ता आणि अरमानमध्ये भांडण झाले होते, त्यानंतर अरमानने तिच्यावर हात उचलला होता. मुनमुनच्या तक्रारीवरून हे प्रकरण कोर्टात पोहोचले होते, त्यानंतर अरमान कोहलीला दंड भरावा लागला होता.