दयाबेनच्या अशी अवस्थेला चाहते का म्हणतायेत पतीच जबाबदार?
व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच बदललेली दिसत आहे.
मुंबई : एकेकाळी 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधील अभिनेत्री दिशा वकानीची वेगळी ओळख होती. या शोमध्ये ती जेठालालची पत्नी दयाबेनची भूमिका साकारत होती. लग्नानंतर दिशा वकानी शोपासून दूर राहून वैयक्तिक आयुष्यात सक्रिय झाली आहे. दिशा वकानीने आई होण्याचा निर्णय घेतला होता आणि बराच वेळ वाट पाहिल्यानंतरही ती शोमध्ये परतली नाही. चाहत्यांना वाटलं की, कदाचित दिशा वाकानी प्रेग्नंसी रजेनंतर शोमध्ये परतेल पण तसं होऊ शकलं नाही. अलीकडेच, अभिनेत्रीचा असा एक फोटो इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. ज्यात ती तिच्या मुलासोबत दिसत आहे.
चाहत्यांनी दिशाच्या पतीचा क्लास घेतला
या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच बदललेली दिसत आहे. त्यामध्ये तिचं वजन खूप वाढलं आहे, जे फक्त तिच्या चेहऱ्यावरुन पाहूनच समजून येतं. दिशा वाकानीच्या या फोटोवरून तिच्या पतीला प्रचंड ट्रोल करण्यात आलं आहे. कमेंट सेक्शनमध्ये अनेकांनी दिशा वाकानीच्या करिअरच्या बरबादीसाठी तिच्या पतीला जबाबदार धरलं आहे.
लोकं पतीला का करतायेत ट्रोल?
एका यूजरने कमेंट सेक्शनमध्ये लिहिलं आहे की, 'तिच्या पतीनं तिचं करिअर उद्ध्वस्त केलं.' तर आणखी एका युजरनं लिहिलं की, 'पती आणि मुलामध्ये मी गोंधळून गेलो होतो.' त्याचप्रमाणे एका यूजरने कमेंट केली की, 'कुटुंबामुळेच करिअर संपल.' लोकांनी अशा सगळ्या कमेंट्स केल्या आहेत आणि दिशा वाकानीच्या पतीवर तिचं करिअर बरबाद केल्याचा आरोप केला आहे.