मुंबई : कॉमेडी टीव्ही मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) आज घरोघरी लोकप्रिय आहे. 2008 सालापासून ही टीव्ही मालिका सातत्याने प्रसारित होत असून आजही ती टीआरपीच्या शर्यतीत इतर टीव्ही मालिकांना स्पर्धा देत आहे. 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या यशामागे कथा आणि या मालिकेतील अनोख्या पात्रांचा मोठा हात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या टीव्ही सीरियल 'जेठालाल' बद्दल सांगणार बऱ्याच गोष्टी सध्या चर्चेत आहेत. जेठालालची भूमिका साकारणारा अभिनेता दिलीप जोशी आज सगळ्यांच्या मनावर राज्य करत आहे ते दमदार अभिनयामुळे.  मीडिया रिपोर्ट्सनुसार, यापूर्वी अशी अफवा पसरली होती की, दिशा वाकाणीनंतर दिलीप जोशी ही शो सोडणार आहेत.


 दिशाने 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये जेठालाल यांच्या पत्नी दया बेनची भूमिका साकारली होती जी खूप लोकप्रिय झाली होती.



मात्र, शो सोडण्याच्या अफवांवर दिलीपने सांगितले की, जेठालाल या व्यक्तिरेखेमुळे मला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले आहे आणि ते गमावणे मला आवडणार नाही. 


दिलीप पुढे म्हणाले की, 'तारक मेहता का उल्टा चष्मा' चांगलं काम करत असताना, हे काम जबरदस्तीने मी का सोडू? ' ही फक्त अफवा होती.