मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील भिडे मास्तरांची मुलगी सोनू ही भूमिका पार पाडणारी अभिनेत्री निधी भानुशाली, आता मालिकेत नसली तर ती कायम चर्चेत असते. मालिकेत साधी सभ्य असणारी सोनू खऱ्या आयुष्यात मात्र प्रचंड बोल्ड आणि हॉट आहे. निधीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. निधीने चाहत्यांच्या मनात आपलं स्थान पक्क केलं. पण निधीच्या मनात एका खास व्यक्तीसाठी खास जागा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपासून निधी आणि पूर्वीचा पप्पू अर्थात अभिनेता भव्या गांधी यांच्या अफेअची चर्चा रंगली होती. पण निधीच्या मनावर राज्य करणारा भव्या नसून दुसरा व्यक्ती आहे. निधीने एका मुलाखतीत बॉयफ्रेन्डचं नाव सांगितलं आहे. निधीच्या बॉयफ्रेंडचं नाव ऋषी अरोरा (Rishi Arora)  आहे.  



निधी आणि ऋषी कायम वेग-वेगळ्या ठिकाणी फिरण्यासाठी जातात. काही दिवसांपूर्वी निधीने ऋषीसोबतचा एक फोटो शेअर केला, ज्यामध्ये तिने तिच्या चाहत्यांना तिच्या प्रवासाशी संबंधित प्रश्न विचारण्यास सांगितले आहे. ईटाइम्स ला दिलेल्या मुलाखतीत, निधीने खुलासा केला की तिला आणि ऋषी दोघांनाही फिरायला आवडतं आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या पेट डॉगला घेवून फिरतात. 


यावेळी निधीने भव्या गांधीसोबत असणाऱ्या रिलेशनशिपबद्दल देखील प्रतिक्रिया दिली. निधी म्हणाली,  'मी आणि भव्या चांगले मित्र आहोत. होणाऱ्या चर्चा फक्त अफवा आहेत..'