मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील (Taarak Mehta Ka Ooltah Chahshmah)आवडतं पात्र दयाबेन गेल्या 3 वर्षांपासून शोमधून गायब आहे. या मालिकेतील अभिनेत्री दिशा वाकाणीच्या पुनरागमनाची वाट पाहत आहेत. तिनं तिच्या पहिल्या मुलाच्या जन्मापासून शोमधून ब्रेक घेतला होता. त्यामुळे आता या शोच्या चाहत्यांसाठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लवकरच दिशा वकानीच्या या शोमध्ये पुन्हा एकदा एण्ट्री करणार आहे.  


आणखी वाचा : 'Mahesh Manjrekar नोकरीवर...', सलमान खाननंतर अभिजीत बिचुकलेचा महेश मांजरेकरांवर निशाणा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिपोर्ट्सनुसार, दयाबेनचं पात्र दिशा वकानीला परत आणण्यासाठी निर्माते तिच्याशी बोलण्यात व्यस्त आहेत. न्यूज18 च्या रिपोर्टनुसार, शोशी संबंधित एका सूत्राने सांगितले की, तारक मेहताच्या टीमने दयाबेनच्या पात्रात परतण्यासाठी दिशाशी संपर्क साधला आणि जर सर्व काही ठीक असेल तर, दिशा वकानी नोव्हेंबर महिन्यात शोमध्ये परतण्याची अपेक्षा आहे. (taarak mehta ka ooltah chashmah fans a good news dayaben may be back on show this month)


आणखी वाचा : ज्या भाषेनं मोठं केलं तिच्याकडेच बॉलिवूडचं दुर्लक्ष? मनोज वाजपेयी म्हणाला...


शोमध्ये पुनरागमन करण्याबाबत दिशाचा निर्णय काय आहे याची सध्या कोणतीही माहिती समोर आलेली नाही. परंतु सूत्रानुसार, अपडेटनुसार असं आहे की दिशा शोमध्ये परतली नाही तर लवकरच तिच्या जागी नवीन अभिनेत्री येऊ शकते. शोच्या चाहत्यांसह निर्माते देखील दिशाच्या शोमध्ये परत येण्याची प्रतिक्षा करत आहेत.


आणखी वाचा : एव्हरग्रीन नागार्जुन मुलालाही लाजवेल इतक्या संपत्तीचे मालक, पाहा एकूण आकडा


या शोमध्ये जुनी पात्रं बदलण्याची बातमी टीव्ही चाहत्यांमध्ये आधीच चर्चेत आली. अलीकडेच या शोमध्ये शैलेश लोढा यांच्या जागी सचिन श्रॉफला कास्ट करण्यात आलं आहे. या शोमध्ये सचिन तारक मेहताची भूमिका साकारताना दिसत आहे. सचिनच्या पुनरागमनाबाबत जुन्या तारक मेहताची भूमिका साकारणाऱ्या शैलेशनं अलीकडेच एक पोस्ट शेअर करत निर्मात्यांची खिल्ली उडवली आहे.