मुंबई : कोरोना व्हायरसची दुसऱ्या लाटेचा अनेकांना फटका पडला आहे. अनेकांपासून त्यांची जवळची माणसं दुरावली गेली. या घटना फक्त सामान्यांसोबतच घडल्या असं नाही. सेलिब्रिटींसोबत अशा घटना घडल्या आहेत. लोकप्रिय मालिका तारक मेहता का उल्टा चष्मामधील अभिनेता भव्य गांधी याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना व्हायरसमुळे भव्य गांधी यांचे वडिल विनोद गांधी यांचं निधन झालं आहे. मात्र वडिलांच्या निधनावर अजून अधिकृत घोषणा केली नाही. मात्र मीडिया भव्य गांधी यांच्या वडिलांना काही दिवसांपूर्वीच कोरोनाची लागण झाली होती. त्यांना वेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. 


विनोद गांधी यांनी 10 दिवस कोरोना व्हायरसशी लढत होते. पण अखेर त्यांनी कोरोनासमोर गुडघे टेकले. भव्य गांधी येत्या काही दिवसांत चुलत बहिणीचं लग्न अटेंड करणार होता. मात्र वडिलांची तब्बेत बिघडल्यामुळे तो गेला नाही. सगळ्यांनी लग्न ऑनलाईन अटेंड केलं. भव्य गांधीच वडिल कंन्सट्रक्शन व्यवसायात होते. त्यांच्या निधनानंतर आता घरात भव्यची आई, मोठा भाऊ आणि त्याची बायको आहे.  


भव्य गांधी आता 'तारक मेहता का उल्टा चष्मा'चा भाग नाही. तरीही लोक त्याला टप्पू या नावाने ओळखलं जातं. भव्य 9 वर्षांपासून 'तारक मेहता का उल्टा चष्मा' काम करत होता. आता त्यांनी अलविदा केलं आहे. 4 साल पहिले त्याने हा शो सोडून त्याच्या जागी अभिनेता राज आनंदकत नवीन टप्पू म्हणून रिप्लेस केलं आहे.