मुंबई : टीव्हीचा प्रसिद्ध कॉमेडी शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मध्ये दिसणाऱ्या प्रत्येक अभिनेत्याचं वेगळं फॅन फॉलोइंग आहे. सर्व कलाकार त्यांच्या चाहत्यांशी जोडलेले राहण्यासाठी दररोज हटके पोस्ट शेअर करताना दिसतात. त्याचबरोबर अलीकडेच या मालिकेच्या एका अभिनेत्याचा बालपणीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोबतच या छोट्या अॅक्टरच्या मानधानविषयी ही सध्या चांगलीच चर्चा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हायरल होत असलेला हा फोटो अभिनेता कुश शाह याचा आहे, जो 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये' गोगी'च्या भूमिकेत दिसत आहे. 


सतत खाण्यासाठी उत्सुक असलेला गोगी या मालिकेत अगदी लहान असल्यापासून ही भूमिका साकारतो आहे. इतर कलाकारांप्रमाणे गोगीचं ही फॅन फॉलोविंग मोठं आहे. प्रसिद्धीसोबतच गोगी एका इपिसोडसाठी चांगलं मानधन देखील घेतो.


मीडिया रिपोर्टनुसार, कुश शाह 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या एका एपिसोडसाठी 18 हजार रुपये घेतो. लहान वयापासूनचं गोगीचं हे पात्र त्यानं उत्तम रित्या रंगवलं आहे. आणि अद्याप या कॉमेडी शोवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करत आहेत.