मुंबई : लोकप्रिय कॉमेडी शो तारक मेहता का उल्टा चश्माचं शूटिंग कायम सुरू असते, मात्र मागच्या काही दिवसांत असं काही घडलं. ज्यामुळे खबरदारी म्हणून शोचं शूटिंग थांबवावं लागलं. वास्तविक, शोमध्ये भिडेची भूमिका साकारणारे मंदार चानवडकर आणि टप्पूची भूमिका साकारणारे राज अनाडकट यांची तब्येत बिघडली. खूप ताप आणि सर्दी झाल्याने दोघंही शूटला पोहोचले नाहीत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशा परिस्थितीत, संपूर्ण क्रूची सुरक्षितता लक्षात घेऊन, त्या दिवशी शूटिंग करताना प्रत्येकाने सावधगिरी बाळगण्याचा प्रयत्न केला. मात्र शोचे निर्माते असित मोदी यांनी संपूर्ण क्रूसाठी कोणताही धोका न घेता त्या दिवशीचं शूटिंग रद्द केलं . रिपोर्ट्सनुसार, दोन्ही कलाकारांना व्हायरल इनफेक्शन झालं होतं मात्र आता ते आधीपेक्षा चांगले आहेत. यापूर्वी मार्चमध्ये मंदार कोविड 19 पॉझिटीव्ह होता. ज्यामुळे तो काही काळ शूटिंगपासून दूर होता.


मात्र, जेव्हा शोचा विचार केला जातो, तेव्हा हा शो काही काळापूर्वी प्रकाशझोतात तेव्हा आला जेव्हा तारक मेहताची भूमिका साकारणारे शैलेश लोढा आणि टप्पूची भूमिका साकारणारे राज, शोमध्ये जेठालालची भूमिका करणाऱ्या दिलीप जोशी यांच्याशी मतभेद झाल्याच्या बातम्या आल्या. दिलीप जोशी यांनी या सर्व अहवालांना बकवास असल्याचं सांगून अफवांना पूर्णविराम दिला होता. याशिवाय, यापूर्वी अशाही बातम्या आल्या होत्या की, शोमध्ये बबिताजीची भूमिका साकारणारी मुनमुन दत्ता शो सोडत आहे. पण मुनमुनने स्वतःच ते नाकारल्याने ही बातमीही निराधार ठरली. यावर्षी जुलैमध्ये या शोला 13 वर्षे पूर्ण झाली आहेत.