शर्मिला टागोरने नकार दिला तेव्हा राजेश खन्नाची अभिनेत्रीला मिळाली साथ, चित्रपटाने नशीब एका रात्रीत चमकलं

Entertainment News : शर्मिला टागोरच्या नाकारलेल्या चित्रपटातून एका रात्रीत स्टार झालेली बॉलिवूडमधील या प्रसिद्ध अभिनेत्रीचा आज वाढदिवस आहे. 

Sep 23, 2024, 09:30 AM IST
1/9

आपण ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत तिची मुलगी बॉलिवूडची एक मोठी स्टार आहे आणि तिचा जावई सुपरस्टार आहे. तिने बाल अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. कुटुंबाच्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे अभिनेत्रीला वयाच्या 16 व्या वर्षी पडद्यावर पदार्पण करावे लागले. 

2/9

60 आणि 70 च्या दशकातील सुंदर आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून तिची ओळख होती. चुलबुली स्वभावामुळे तिने सर्वांची मनं जिंकली होती. आम्ही बोलत आहोत, काजोलची आई आणि सिंघम अजय देवगण यांची सासू तनुजा मुखर्जी यांच्याबद्दल. 

3/9

मराठी कुटुंबात 23 सप्टेंबर 1943 ला जन्मलेल्या तनुजा यांची आई अभिनेत्री शोभना समर्थ आणि वडील निर्माते वडील कुमारसेन समर्थ आहेत. तनुजा लहान असतानाच आई वडील हे वेगळे झाले. नूतन, चतुरा, रेश्मा, जयदीप आणि तनुजा असे हे भावंड लहानपासून अनेक संघर्षातून गेले. 

4/9

'हमारी बेटी' चित्रपटात बालकलाकाराची भूमिका साकारल्यानंतर जवळपास 10 वर्षांनी तनुजाला 'छबिली' चित्रपटाद्वारे दुसऱ्यांदा बॉलिवूडमध्ये पदार्पण करावे लागले. त्यांनी त्यांच्या संपूर्ण चित्रपट कारकिर्दीत केवळ 35 चित्रपट केले आहेत, परंतु त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर नक्कीच छाप सोडली.

5/9

मात्र, 1961 मध्ये आलेल्या 'हमारी याद आएगी' या चित्रपटाने तनुजाला चित्रपटसृष्टीत एक प्रमुख अभिनेत्री म्हणून ओळख मिळवून दिली.नेहमी हसतमुख असणाऱ्या तनुजाला तिच्या पहिल्या चित्रपट छबिलीच्या शूटिंगदरम्यान दोन थप्पड खाव्या लागल्या होत्या. 

6/9

या चित्रपटातील एका दृश्यात तनुजाला रडावे लागले होते, पण तिला कसे रडावे हेच कळत नव्हते. ती पुन्हा पुन्हा हसत होती. केदार शर्मा या चित्रपटाचे दिग्दर्शक होते. IANS च्या रिपोर्टनुसार, जेव्हा त्याने तिला सांगितले की रडण्याचे दृश्य आहे, तेव्हा तिने स्पष्टपणे सांगितले की ती आज रडण्याच्या मूडमध्ये नाही. डायरेक्टर साहेब संतापले आणि त्यांनी तनुजाला जोरदार थप्पड मारली. 

7/9

तनुजाने घरी जाऊन आईला हा प्रकार सांगितला असता, आई शोभना यांनीही तनुजाला पुन्हा चपराक मारली. त्यानंतर ती तनुजासोबत चित्रपटाच्या सेटवर परत आली आणि केदार शर्माला म्हणाली की आता रडत आहे, शूटिंग सुरू करा. त्यानंतर रडत रडत तनुजाने या सीनसाठी परफेक्ट शॉट दिला.

8/9

'एक बार मुस्कुरा दो' चित्रपटाच्या सेटवर तनुजा यांची शोमू मुखर्जींची भेट झाली. काही दिवस एकमेकांना भेटल्यानंतर तनुजा आणि शोमू मुखर्जी डेट करू लागले. त्यानंतर 1973 मध्ये दोघांचे लग्न झाले. काजोल आणि तनिषा या दोन मुलींचा जन्म झाला. हे लग्न टिकलं नाही, ते वेगळे राहू लागले पण त्यांनी कधी घटस्फोट घेतला नाही. दरम्यान शोमू यांचं वयाच्या 64 व्या वर्षी 10 एप्रिल 2008 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

9/9

तुम्हाला जे जाणून आश्चर्य वाटेल की, तनुजाने धर्मेंद्र यांच्या कानाखाली मारली होती. झालं असं की, तनुजा आणि धर्मेंद्र 'चांद और सूरज' चित्रपटाचं शूटिंग करत होते. त्यांची चांगली मैत्री झाली होती, दोघ खूप मस्ती करायचे आणि दारू प्यायचे. चित्रपटाच्या शूटिंगमुळे ते तासंतास एकत्र वेळ घालवत होते. एका दारुच्या नशेत धर्मेंद्र यांनी तनुजासोबत फ्लर्ट करण्याचा प्रयत्न केला. तनुजाला ते अजिबात आवडलं नाही. निर्लज्ज म्हणून तनुजाने धर्मेंद्रच्या कानाखाली मारली होती.