मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेच्या माध्यमातून घरा-घरात पोहोचलेल्या अभिनेता समय शाहला काही गुंडांनी जीवे मारण्याची धमकी दिली. काही दिवसांपूर्वी देखील त्याला दोन वेळा धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी त्यानी बोरीवली पोलीस ठाण्यातत्याने तक्रार दाखल केली असून काही गुंड सतत जीवे मारण्याची धमकी देत असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. शिवाय त्याने सीसीटीव्ही फुटेज देखील पोलिसांना दिले आहेत. सध्या हे फुटेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 मालिकेमध्ये गोगीची भूमिका साकारणारा समय सध्या मोठ्या अडचणीमध्ये आहे. हे गुंड त्याच्या बिल्डिंगखाली उभं राहून त्याला शिवीगाळ करतात. शिवाय त्याला जीवे मरण्याची धमकी देखील देतात. ऐके दिवशी गुडांनी त्याला रोखल आणि शिविगाळी करू लागले. त्यामुळे त्याने पोलिसांना फोन केल्यानंतर गुंडांनी तेथून पळ काढला आणि ‘तुला पाहून घेऊ’ अशी धमकी देखील दिली. 


यासंबंधी खुद्द समयने देखील सोशल मीडियावर एक स्टोरी शेअर केली, 'दोन दिवसांपूर्वी देखील हा इसम माझ्या बिल्डिंगखाली आला आणि मला त्रास देवू लागला. मला काहीच माहित नाही तो असं का करत आहे. मला त्रास देण्यामागे त्याचा काय उद्देश आहे?  एवढचं नाही तर त्याने मला जीवे मारण्याची धमकी देखील दिली.'


माझ्यावर जे प्रेम करतात त्यांच्यासोबत मी ही माहिती शेअर करत आहे. कारण हे माझ्यासाठी आणि कुटुंबीयांसाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे. असं तो स्टोरीमध्ये म्हणाला आहे. आता या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.