मुंबई : गेल्या तेरा वर्षांपासून 'तारक मेहता का उल्टा चष्मा' प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. ही मालिका टप्पूसेनेमुळे लहान मुलांना आणि गुकूळ धाम सोसायटी मधील असलेल्या एकीमुळे मोठ्यांना आवडते. मालिकेतील प्रत्येक कलाकाराने चाहत्यांच्या मनात एक खास जागा निर्माण केली आहे. त्यामधील जेठालाल म्हणजे अभिनेता दिलीप जोशी आणि दयाबेन म्हणजे अभिनेत्री दिशा वकानीने तर त्यांच्या अभिनयाने आणि विनोदीबुद्धीने चाहत्यांचं  लक्ष वेधलं आहे. आता पुन्हा दोघांची चर्चा रंगत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रंगणाऱ्या चर्चांना कारण देखील तसचं आहे. सध्या दयाबेन आणि जेठालालचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. याव्हिडिओमध्ये दयाबेनचा गरबा आणि जेठालाललने धरलेला ठेका सर्वांचं लक्ष वेधत आहे. जेठालालच्या अंदाजापुढे दयाबेनचा गरबा देखील फेल आहे.  जेठालाल आणि दयाबेनचा हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


सासू- सुनांची भांडणं आणि कावेबाजपणा अशा मालिकाच्या रटाळ कथानकांना शह देत 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. पण, काही महिन्यांपासून या मालिकेला अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. मालिकेत मुख्य भूमिकेत झळकणाऱ्या 'दयाबेन' अर्थात अभिनेत्री दिशा वकानी हिने 'तारक मेहता.....'ला रामराम ठोकला आहे.


गरोदर असलेल्यामुळे दयाबेनने मालिकेतून काढता पाय घेतला. आता दयाबेन पुन्हा कधी येणार याकडे सर्व चाहत्यांचं आणि प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. महत्त्वाचं म्हणजे आचा मालिकेत सर्वात जास्त दोन  महत्त्वाचे मुद्दे आहेत. एक म्हणजे दयाबेनचं पुन्हा पदार्पण आणि पोपटलालचं लग्न...