मुंबई : अभिनेता आयुष्मान खुरानाची पत्नी ताहिरा कश्यप नुकतीच शिल्पा शेट्टीच्या 'शेप ऑफ यू' शोमध्ये दिसली. जिथे तिने तिच्या आयुष्याशी निगडीत बरेच सिक्रेट ओपन केले आहेत. पण बोलता-बोलता ताहिराने तिच्या बेडरूमचं रहस्यही उघड केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सेक्स लाईफबद्दल सांगितली ही गोष्ट 
ताहिरा कश्यप एक लेखिका आहे. त्यामुळे शोमध्ये पोहोचलेल्या शिल्पा शेट्टीने ताहिराला तिच्या पुस्तकात सेक्स हा शब्द वापरताना किती आरामदायक वाटतं. असा प्रश्न केला. यावर ताहिराने न डगमगता उत्तर देत सांगितलं की, कॅलरी बर्न करण्यासाठी सेक्स हा सर्वोत्तम व्यायाम असल्याचं तिने वर्णन केलं. ती एवढ्यावरच थांबली नाही तर ती म्हणाली - 'आमच्या बाबतीत खूप कॅलरीज बर्न होतात असंही ती बोलून गेली.''


ताहिराने कर्करोगादरम्यान केस कापल्याचा अनुभवही शेअर केला. तिच्या म्हणण्यानुसार, जेव्हा तिने केस कापल्यानंतर तिचा चेहरा आरशात पाहिला तेव्हा ती स्वतःला खूपच सेक्सी वाटली. तिच्या म्हणण्यानुसार तिला सोनाली बेंद्रेकडून खूप प्रेरणा मिळाली. सोनाली बेंद्रेही कॅन्सरने त्रस्त होती आणि उपचार घेवून अमेरिकेतून परतल्यानंतर तिनेही केस कापले. ताहिरालाही कर्करोग झाला होता. मात्र उपचारानंतर आता ती पुर्णपणे ठिक आहे.


आयुष्मान खुरानाबद्दल बोलायचं झालं तर, 'विक्की डोनर', 'दम लगा के हैशा', 'बधाई हो', 'अंधाधुन', 'आर्टिकल 15' मध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्यानंतर आता आयुष्मान खुराना 'अनेक' या सिनेमांत दिसणार आहे. ज्यामध्ये त्याची भूमिका खूप वेगळी असेल. 27 मे रोजी 'अनेक' रिलीज होणार आहे. या चित्रपटात तो एका गुप्त पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे.