मुंबईः सैफ अली खान आणि करिना कपूरचा मुलगा तैमूर हा या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत असतो. छोटा नवाब तैमूर हा कोणत्याही सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. त्याची एक झलक कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी माध्यमांची धडपड असते. तैमूरही एखाद्या सेलिब्रिटीप्रमाणे माध्यमांना पोज देतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


तैमूर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या व्हिडीओत तो करिना आणि सैफच्या पाठीमागे लपल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल माीडियावर व्हायरल होत आहे. 



सैफ, करिनाने एका एका बूक लाँच कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यावेळी तैमूरही उपस्थित होता.



यावेळी हातात एक पुस्तक घेऊन कॅमेऱ्यासमोर तैमूर उभा आहे. त्यावेळी मागून सैफ आणि करिना त्याच्याजवळ येतात. मात्र, तैमूर वडिलांच्या मागे जाऊन लपतो.


झालं असं की, तैमूर पुस्तक हातात घेऊन उभा असताना अचानक त्याच्या डोळ्यात काही तरी गेल्याने तो डोळा पुसू लागतो आणि वडील सैफ यांच्या मागे जाऊन लपतो. मात्र त्याचवेळी सैफ आणि करिना हे माध्यमांना पोज देतात. यापूर्वीही तैमूर अनेक व्हिडीओमधून नेहमीच चर्चेत राहिला आहे.  यापूर्वीही फोटो काढणाऱ्या फोटोग्राफरवर तैमूर भडकला होता आणि फोटो काढण्यास मनाई करत होता..


करिना कपूर आगामी सिनेमा 'लालसिंग चड्ढा'मध्ये आमिर खानसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा 11 ऑगस्ट 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. सैफ अली खानही नुकताच 'बंटी और बबली 2' सिनेमात दिसला होता. मात्र हा सिनेमा फार काही कमाल करू शकला नाही