`तैमूरचे फोटो पाहून आनंदी होतात, पण लोकांची मुलं पाहिल्यानंतर मला...` करीनाचं वक्तव्य चर्चेत
बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खानचा हा व्हिडीओ ठरतोय चर्चेचा विषय..
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. करीना सोशल मीडियावर सक्रिय असल्याचं दिसतं. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत करीना चाहत्यांच्या संपर्कात राहते. बऱ्याचवेळा करीना तिने केलेल्या वक्तव्यांमुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरते. करीनाचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमुळे करीना ट्रोलिंगचा शिकार झाली आहे.
करीनाचा हा व्हिडीओ वादग्रस्त वक्तव्यांमुळे सोशल मीडियावर चर्चेत असणारा बॉलिवूड अभिनेता कमाल आर खान म्हणजेच केआरकेनं ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओ करीना झूमशी बोलतानाचा आहे. व्हिडीओत करीना बोलते की, 'लोक मला सांगतात की त्यांनी तैमूरचे फोटो पाहिले, त्याचे फोटो पाहून त्यांना खूप आनंद झाला. मला हे खूप विचित्र वाटतं, कारण मी इतरांची मुलं पाहत नाही आणि त्याने मला आनंद होत नाही. मी अशीच आहे.
एकीकडे सोशल मीडिया नेटकरी करीनाला खूप ट्रोल करत आहेत, तर दुसरीकडे काही नेटकऱ्यांनी तिला पाठिंबा दिला आहे. एक नेटकरी म्हणाला, 'हे स्टार किड्स आहेत, त्यांना कोणाच्या सुख-दु:खाची पर्वा नाही.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'आम्ही फक्त एका छोट्या क्लिपने कोणाचाही जज करू शकत नाही.' तिसरा नेटकरी म्हणाला, या व्हिडीओमुळे लाल सिंग चड्डा फ्लॉप होऊ नये'. आणखी एक नेटकरी म्हणाला, 'कश स्त्री आहे ही, मुलं कोणाचीही असो त्यांना पाहून आनंद होतोच, पण काय बोलावं. ती अभिनेत्री आहे.
दरम्यान, याआधी करीना घराणेशाहीवर केलेल्या वक्तव्यामुळे ट्रोल झाली होती. त्यावेळी नेटकरी करीनावर नाराज झाल्याचे सोशल मीडियावर दिसून आले होते. करीना एका मुलाखतीत म्हणाली होती, 'प्रेक्षकांनी आम्हाला स्टार बनवलं आहे, इतर कोणीही नाही. तीच माणसं बोटे दाखवत आहेत, हेच लोक चित्रपट पाहायला जात आहेत ना? नका जाऊ. तुम्हाला कोणी जबरदस्ती केली आहे.
सध्या करीना तिच्या आगामी 'लाल सिंह चड्ढा' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. आमिर खान स्टारर 'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटात करीनासोबत मोना सिंग आणि नागा चैतन्य हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.