मुंबई : तैमूर अली खान बॉलीवूड इंडस्ट्रीमधील सर्वाधिक चर्चिले जाणारे स्टार किड आहे. तैमूर केवळ दीड वर्षांचा आहे. इतक्या कमी वयात त्याचा फॅन फॉलोविंग जबरदस्त आहे. त्याची कोणतीही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होण्यास वेळ लागत नाही. नुकताच त्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात तैमूर आई करीनासोबत प्ले स्कूलमध्ये जाताना दिसतोय. मात्र तैमूरला प्ले स्कूलमध्ये जाण्यास अजिबात रस नाहीये असंच व्हिडीओमध्ये दिसतंय. वीरे दी वेडिंग या आगामी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेली करीना वेळ काढून आपल्या लाडक्याला शाळेत सोडण्यासाठी गेली होती. मात्र यावेळी प्ले स्कूलमध्ये जाण्यात तैमूरला अजिबात रस नाहीये. मात्र त्याला जबरदस्तीने सोडले जाते.