Tajdar Amrohi Objects to Meena Kumari Biopic: हल्ली बॉलिवूडमध्ये जमाना आहे तो म्हणजे बायोपिकचा. त्यामुळे सर्वत्र चर्चा असते ती म्हणजे कोणत्या मोठ्या कलाकाराची जर कोणी भुमिका करत असेल तर तेव्हा आता या कलाकाराची कोण भुमिका करणार याची चांगलीच चर्चा रंगलेली असते. सध्या चर्चा आहे ती म्हणजे ज्येष्ठ दिवंगत अभिनेत्री मीना कुमारी यांची. त्यांच्या अभिनयाचे आपण सर्वचजण चाहते आहोत. ब्लॅक एन्ड व्हाईट काळामध्ये त्यांच्या चित्रपटाची आणि नृत्याची चांगलीच चर्चा रंगलेली होती. त्यातून त्यांचे वैयक्तिक आयुष्यही हे फारच गुंतागुंतीचे होते. त्यामुळे सध्या त्यांच्या आयुष्यावर बायोपिक येणार असून क्रिती सनन मीना कुमारी यांच्या भुमिकेतून दिसणार असल्याच्या चर्चा आहेत. परंतु यावेळी आमरोही परिवारनं यावर आक्षेप घेतला असून मीना कुमारी यांचे चिरंजीव ताजदार आमरोही यांनी माध्यमांशी चर्चा केली असून आपली नाराजीही व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी क्रिती सनन आणि बॉलिवूडवर टीकास्त्र सोडले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या अभिनेत्री क्रिती सनन ही 'आदिपुरूष' या आपल्या चित्रपटातून दिसली होती. परंतु हा चित्रपट पुर्णपणे फ्लॉप गेला असून समाजमाध्यमांमध्ये यावरून चित्रपटाला प्रचंड ट्रोल करण्यात आले आहेत. आता गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे की क्रिती ही मीना कुमारी यांच्या बायोपिकमधून दिसणार आहे. फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा आपल्या या चित्रपटाच्याद्वारे दिग्दर्शनातून पदार्पण करणार आहेत. परंतु यावर मात्र मीना कुमारी यांच्या कुटुंबांने आक्षेप घेतला आहे. ताजदार आमरोही यांनी 'काईमोई'ला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे.


ताजदार आमरोही म्हणाले की, ''काही उद्योगपती पूर्णपणे दिवाळखोर त्याचसोबत चोर झाले आहेत. त्यांना माझ्या क्षेत्रात आणि डोमेनमध्ये प्रवेश करण्याचा आणि पाऊल ठेवण्याचा अधिकार नाही. ते फक्त चोरच नाहीत तर दरोडेखोरही आहेत. माझ्या संमतीशिवाय चित्रपट तयार करायचा कुणालाही अधिकार नाही. ती माझी आई आहे आणि कमाल आमरोही हे माझे वडील आहेत. हे फिल्ममेकर्सना सांगा की तुम्ही तुमच्या आईवडिलांवर बायोपिक तयार करा जे त्यांना अजिबातच जमणार नाही कारण ते कोणी सेलिब्रेटी नव्हते. माझी आई ही सुप्रसिद्ध अभिनेत्री होती. त्यातून हे जे काही करतात ते सर्व खोट्या गोष्टींवर असते.'', असं ते म्हणाले, शेवटी जर का चित्रपट केला तर आपल्या बहीणसह ते कायदेशीर कारवाई करतील असेही त्यांनी सांगितले. 


हेही वाचा - Sushant Singh Rajput Case: रिया चक्रवर्तीला मोठा दिलासा, सीबीआयनं दिला महत्त्वाचा निर्णय


''बाबांचे 29 वर्षांपूर्वी निधन झाले आणि पन्नास वर्षांपूर्वी छोटी अम्मी यांचे निधन झाले पण ते लोकांच्या मनात अजूनही जिवंत आहेत. मी म्हणेन की छोटी अम्मीचे सर्वोत्कृष्ट चित्रपट तिच्या बाबांशी झालेल्या लग्नानंतर झाले. लग्नापूर्वी तिने पौराणिक चित्रपटांतून काम केले. हा माझ्या आईच्या कारकीर्दीतला सर्वात महत्त्वाचा टप्पा होता. लग्नासाठी बाबांनी छोटी अम्मीला घरातून दूर नेले होते असे मानले जाते. नाहीतर ती छोटी अम्मीच बाबांच्या घरी आली होती आणि ती नकळत प्रेमात पडली हे मी सांगू शकतो. त्या काळात चित्रपटसृष्टीतील प्रेक्षक हे स्टुडिओच्या अंधाऱ्या कोपऱ्यात भेटायचे. फोनवरून त्यांचे प्रेम फुलले. माझ्या आईचा आवाज इतका चांगला होता की माझे वडील तिच्या प्रेमात पडले'', असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी क्रिती सननलाही या चित्रपटापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.