मुंबई : अमृता खानविलकर आणि अंकुश चौधरीच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्ही याआधी  तुमच्या या आवडत्या सेलिब्रिटींसोबत सेल्फी काढण्याचा खूप प्रयत्न केला असाल. पण त्यांच्या शेजारी असणाऱ्या गर्दीमुळे तुम्हाला कदाचित ते शक्य झाले नसेल.


किंवा त्यांच्याजवळ कसे पोहोचायचे हेच तुम्हाला माहिती नसेल. पण आता काळजी करु नका. तुम्हाला पाहिजे तेव्हा त्यांच्याजवळ जाऊन तुम्ही पाहिजे तसा सेल्फी काढू शकता.


हो. खरचं. अस आता प्रत्यक्षात होणार आहे. हे वॅक्स म्युझिअममुळे शक्य झाले आहे.


कारण आता देवगड येथील वॅक्स म्युझियममध्ये महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री अमृता खानविलकर आणि अभिनेता अंकुश चौधरी यांचे मेणाचे पुतळे साकारण्यात येणार आहेत.  


येत्या २१ ऑगस्ट रोजी या पुतळ्यांचं अनावरण होणार आहे. वॅक्स कलावंत सुनील कंडलूर यांनी अमृता आणि अंकुश यांचे मेणाचे पुतळे बनवण्याचे काम हाती घेतले आहे. 


रिंकू आणि परश्यासोबतही सेल्फी


लोणावळ्यातील आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या सुनील सेलिब्रेटीज वॅक्स म्युझियम आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथे नव्याने सुरु झालेल्या वॅक्स म्युझियममध्ये सैराटफेम आर्ची आणि परशा (रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर) यांचे मेणाचे पुतळे उभारण्यात आले आहेत. त्यामुळे या 'सैराट' जोडीसोबत याआधीच अनेकांनी सेल्फी काढले आहेत.