मुंबई : साऊथ आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटिया, जिचा अलीकडचा तेलगू चित्रपट 'F3' हिट झाला आहे. तिने नुकतच एक मोठं विधान करत आपली भिती व्यक्त केली.   ती म्हणाली तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी भीती तिची स्मृती गमावणं आहे. सध्या मुंबईत शूटिंग करत असलेल्या या अभिनेत्रीने मंगळवारी तिच्या शूटिंगच्या ठिकाणी पोहोचण्याची वाट पाहत ट्विटरवर चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देण्याचं ठरवलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या संवादादरम्यान, तिला एक प्रश्न विचारण्यात आला होता की, तिची सगळ्यात मोठी भीती काय आहे. ज्यावर तमन्नाने उत्तर देत सांगितलं की, 'माझी स्मरणशक्ती हरवणं.. हे मला सगळ्यात जास्त, भितीदायक वाटतं.'  या अभिनेत्रीने तामिळ चित्रपट 'धर्मदुराई' मधील शुभशिनी आणि 'बाहुबली' मधील अवंतिका ही पात्रं साकारली आहेत.  


वास्तविक जीवनात कोणत्या काल्पनिक पात्राला भेटण्यासाठी ती सर्वात जास्त उत्सुक असेल असं विचारल्यावर तमन्ना म्हणाली, 'शेरलॉक होम्स.'  


या संवादात तमन्नाने या प्रश्नाचं उत्तरही दिलं की तिला चॉकलेट जास्त आवडतं की आईस्क्रीम? याला उत्तर देत अभिनेत्रीने सांगितलं की, तिला 'चॉकलेट आईस्क्रीम' आवडतं. तमन्नाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, ही अभिनेत्री  साऊथमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. याशिवाय ती हिम्मतवाला, तुतक तुतक तुतिया यांसारख्या काही हिंदी चित्रपटांमध्येही दिसली आहे. आता ही अभिनेत्री बोले चुडिया, प्लॅन ए प्लॅन बी, बबली बाऊन्सर या तीन हिंदी चित्रपटांमध्ये पुन्हा एकदा दिसणार आहे.