तमन्ना भाटियाचं हे बोल्ड फोटोशूट पाहिलं का?...ब्लू शॉर्ट वनपीसमध्ये फ्लॉन्ट केली फिगर
प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटियाच्या नवीन फोटोंचा सोशल मीडियावर बोलबाला आहे.
मुंबईः प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटियाने नुकतच एक फोटोशूट केलं आहे. या नवीन फोटोंचा सोशल मीडियावर बोलबाला आहे. तमन्नाने ब्लू रंगाच्या वनपीसमधून तिचा ग्लॅमरस लूक फ्लॉन्ट केला आहे.ज्यामध्ये ती किलर लूक देताना दिसत आहे.
तमन्नाचा हा ड्रेस इतका टाईट आहे की तिची टोन्ड फिगर स्पष्टपणे दिसत आहे. तिचा लूक पूर्ण करण्यासाठी तमन्नाने सोनेरी रंगाचे कानातले घातले असून केस मोकळे ठेवले आहेत.
फक्त ब्लू ड्रेसच नाही तर ब्लू हिल्स घालून तमन्नाने हे बोल्ड फोटोशूट केलं आहे. हिल्सवर फोकस करून सावरतानाची पोज देऊन तमन्नाने तिच्या चाहत्यांना घायाळ केलं आहे. तमन्नाच्या या फोटोशूटवर चाहत्यांकडून कमेंट्सचा पाऊस पडत आहे. चाहत्यांकडून तमन्नाच्या सौंदर्याचं कौतुक करताना दिसत आहेत. तमन्ना सोशल मीडियावरून तिच्या चाहत्यांसोबत कनेक्ट असते. नेहमीच ती तिचे फोटोशी सोशल मीडियावर शेअर करते.
तमन्ना या एकेरी नावानेच तिला ओळखलं जातं. तमन्नाने तेलुगू, तमिळसह अनेक हिंदी सिनेमातही काम केलं आहे. 'बाहुबली' सिनेमातील तिच्या अभिनयाचं विशेष कौतुक झालं होतं.
या लूकमध्ये तमन्ना भाटिया Amazon Prime च्या पाचव्या वर्धापन दिनाला हजेरी लावण्यासाठी गेली होती. तमन्नाने इंस्टाग्राम अकाउंटवर तिच्या लुकचे फोटो शेअर केले आहेत.