अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा हे बॉलिवूडमधील सध्याचं चर्चेत असणारं जोडपं आहे. सोशल मीडियावर या दोघांची फार चर्चा असते. तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा दोघांनीही या नात्यावर शिक्कामोर्तब केलं असून, अनेक कार्यक्रमात दोघे एकत्र हजेरी लावत असतात. नुकतंच दोघे दिवाळी पार्टीतही एकत्र दिसले होते. दरम्यान, आता तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांच्या लग्नाची चर्चा रंगली आहे. नुकतंच एका रिपोर्टनुसार त्यांच्या लग्नाची एक मोठी घडामोड समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा मागील अनेक महिन्यांपासून एकमेकांना डेट करत आहेत. त्यांच्या डेटिंगसंबंधी रोज नवी माहिती समोर येत असते. त्यातच आता तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांच्या लग्नासंबंधी एक माहिती समोर आली आहे. ज्यानुसार, तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा गांभीर्याने लग्नाचा विचार करत आहेत. आपल्या नात्याला आता एक नवं रुप देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. 


तमन्ना भाटियाचं वय 30 च्याही पुढे आहे. यामुळे कुटुंबीय तिच्यावर लग्नासाठी दबाव टाकत आहे. यानंतर तमन्ना भाटिया आणि विजय वर्माचे चाहते आनंदात आहेत. दरम्यान दोघांनीही अद्याप यासंबंधी अधिकृत भाष्य केलेलं नाही. 


मनोरंजन क्षेत्रात तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांच्या अफेअरची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे. दोघांनी ‘लस्ट स्टोरीज 2’ वेब सीरिजमध्ये एकत्र काम केलं होतं. या वेब सीरिजच्या निमित्ताने तमन्ना भाटियाने पहिल्यांदाच बोल्ड सीन दिले होते. विजय वर्मासह तिने हा किसिंग सीन दिला होता. याच वेब सीरिजच्या शुटिंगदरम्यानच दोघे एकत्र आले होते आणि नात्यात अडकले होते. यानंतर आता दोघांच्या लग्नाची चर्चा रंगली आहे.