मुंबई : तमिळ अभिनेत्री गायत्री सईने (Gayatri Sai) बुधवारी चेन्नई महिला पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. गायत्रीने पिझ्झा डिलीव्हरी बॉय विरोधात तक्रार केली आहे. अभिनेत्रीचा आरोप आहे की, पिझ्झा डिलीव्हरी बॉयने तिचा नंबर अडल्ट ग्रुपवर शेअर केला आहे. याची माहिती स्वतः गायत्रीने सोशल मीडियावर दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत्री गायत्री सईने ट्विटरवर याची पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये तिने पिझ्झा डिलीव्हरी बॉयचा फोटो शेअर केला आहे. त्यासोबत लिहिलं आहे की,'डॉमिनोझ पिझ्झा चेन्नईच्या डिलीव्हरी बॉयने नऊ फेब्रुवारीला माझा नंबर अडल्ट ग्रुप व्हॉट्सऍपवर शेअर केला.'



अभिनेत्रीने पुढे लिहिलं आहे की,'डिलीव्हरी बॉयची त्याच्या ऑफिसमध्ये देखील तक्रार केलेली नाही. कारण त्या लोकांना माझ्याशी चर्चा करायची होती. माझ्याकडे खूप फोन कॉल्स आणि व्हॉट्सऍप मॅसेज येतात. जिथे माझा नंबर शेअर केला आहे तिथून मला भरपूर फोन येत आहेत. तुम्ही सर्वांनी काळजी घ्या.'



गायत्री सईला दिग्दर्शक मणि रत्नम यांच्या 'अंजली' सिनेमात पहिला ब्रेक मिळाला होता. या सिनेमात तिने बालकलाकार म्हणून काम केलं आहे.