Thalapathy Vijay Video : तमिळ सुपरस्टार थलपती विजयचे लाखो चाहते आहेत. तर त्याच्या या चाहत्यासाठी विजय हा काही ना काही खास प्लॅन करताना दिसतो. त्याची एक झलक पाहण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक असतात. तर सध्या विजयचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओत तो त्याच्या चाहत्यांना सरप्राइज व्हिजीट देताना दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विजय सध्या तिरुवनंतपुरममध्ये त्याचा आगामी चित्रपट 'द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम'चं शूटिंग करत आहे. विजयनं तिरुवनंतपुरम त्याच्या हॉटेलच्या बाहेर चाहत्यांची भेट घेतली. खरंतर ते सगळेच त्याच्या स्वागतासाठी बाहेर थांबले होते. हे पाहता विजयनं त्याच्या चाहत्यांना नाराज केलं नाही आणि तो त्यांना भेटायला गेला. व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की थलपथी विजय हॉटेलच्या बाहेर पडतो आणि त्याचं नाव घेत असलेल्या त्याच्या चाहत्यांच्या दिशेनं येताना दिसतो. जेव्हा त्याचे चाहते त्याचं नाव घेत असतात तेव्हा विजय त्यांना इशारा करुन दाखवतो की थांबा मी तुमच्याकडेच येतोय. तो जवळ येतो तर तेव्हा त्याची एक चाहती त्याच्या गळ्यात फुलांचा हार घालते. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


विजयनं केलेलं हे कृत्य त्याच्या चाहत्यांना प्रचंड आवडलं. विजयचं लाखे चाहते जे त्याला यावेळी भेटू शकले नाही ते व्हिडीओवर कमेंक करत आहेत. अनेकांनी लाल रंगाचं हार्ट शेप इमोटिकॉन कॉमेन्टमध्ये टाकलं आहे. विजय विषयी बोलायचे झाले तर तो सोमवारी तिरुवनंतपुरमला पोहोचला. विमानतळावर त्याचे चाहते त्यांची प्रतिक्षा करत होते. तर मंगळवारी विजय त्याच्या चाहत्यांना भेटला. त्यावेळी तो त्याच्या सगळ्या चाहत्यांना भेटला आणि त्यानंतर त्यानं बसवर चढून सेल्फी घेतली. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


विजयच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तो त्याचा आगामी चित्रपट 'द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम' च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन वेंकट प्रभु करत आहेत. तर असं म्हटलं जातं की राजकीय करिअरला सुरुवात करण्याआधी असलेला हा त्याचा अखेरचा चित्रपट असेल. तर या चित्रपटात विजय व्यतिरिक्त प्रशांत, प्रभुदेवा, स्नेहा, मोहन आणि मीनाक्षी चौधरी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तर या चित्रपटाला युवान शंकर राजा यांनी संगीतबद्द केलं आहे.