मुंबई : तमिळ दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर के वी आनंद यांचं शुक्रवारी चेन्नईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. ते 54 वर्षांचे होते. आनंद यांनी फोटो जर्नलिस्ट म्हणून आपल्या कारकिर्दिला सुरूवात केली. त्यानंतर गोपुरा वसलीले, मीरा, देवर मगन, अमरान आणि तिरुडा तिरुडा सारख्या चित्रपटांमध्ये प्रख्यात सिनेमॅटोग्राफर पीसी श्रीराम यांना असिस्ट केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यानंतर श्रीराम यांनी 1994 साली मल्याळम सिनेमा थेनमविन कोमबाठ (Thenmavin Komnath)करता के वी आनंद यांचं नाव सुचवलं. या सिनेमाला आनंद यांना सिनेमॅटोग्राफी करता राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.  


यानंतर आनंद यांनी मिन्नारमा, चंद्रलेखा, मुधालवन, जोश, नायक, बॉईज, खाकी आणि शिवाजी यासारख्या सिनेमांची सिनेमॅटोग्राफी केली आहे. 2005 मध्ये काना कानदेन (Kana Kandaen) या सिनेमाच्या माध्यमातून दिग्दर्शन डेब्यु केलं आहे. त्यांनी अयान, को, मॅटरनस अनगेन, कवन आणि कप्पान सारख्या सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे. 



के वी आनंद यांच्या निधनानंतर अनेक कलाकारांनी दुःख व्यक्त केलं आहे. गौथम कार्थिक यांनी ट्विटरवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. 




सिनेमाटोग्राफर-दिग्दर्शक संतोष शिवन यांनी देखील ट्विटरवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.