मुंबई : 'झलक दिखला जा 11'मधून घरां-घरात पोहचलेली तनीषा मुखर्जी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर ही अभिनेत्री कायमच सक्रिय असते. मात्र सोशल मीडियावर ही अभिनेत्री एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.  अभिनेत्रीने वयाच्या 39 व्या वर्षी तिची अंडी फ्रिज करण्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. याबद्दल खुलेपणाने तिने तिचं मत मांडलं आहे.  अभिनेत्री तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते. आता ती पुन्हा एकदा तिच्या  वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घेतला एग्स फ्रिज करण्याचा निर्णय
तनिषा मुखर्जीने एग्स फ्रिज करण्याबद्दल बोलताना म्हणाली, ''एकदा मी खूप कन्फूझ होते. कारण मी खूप मोठा निर्णय घेत होते.  मी 39 वर्षांची होते आणि मला माझे एग्ज फ्रिज करायचे होते. मला मूल नव्हतं आणि या सगळ्या गोष्टी माझ्या मनात सतत चालू होत्या. पण मग मी ठरवलं आणि वयाच्या ३९ व्या वर्षी मी एग्ज फ्रिज करण्याचा निर्णय घेतला.  पण या सगळ्या प्रक्रियेमुळे माझं वजन खूप वाढलं होतं. एग्ज प्रक्रियेमुळे ते तुमच्या शरिरात भरपूर प्रोजेस्टेरॉन पंप करतात ज्यामुळे तुमचं शरिर खूप फुगतं. यामुळे वजन वाढत नाही आणि तुम्ही खूप सुंदर बनता. मला गरोदर स्त्रिया खूप आवडतात मला माझी एग्ज फ्रिज करताना खूप आनंद होत आहे.''
 
तनिषा मुखर्जी पुढे म्हणाली, 'मला वयाच्या ३३ व्या वर्षी माझे एग्ज फ्रीज करायचे होते. पण जेव्हा मी माझ्या डॉक्टरांकडे गेले तेव्हा त्यांनी असं करण्यास मला नकार दिला. त्यावेळी डॉक्टरांनी मला सांगितलं की, याचा तुमच्या शरीरावर खोलवर परिणाम होतो. मला डॉक्टरांनी तेव्हा असा सल्ला दिला की, जो पर्यंत मला मूल होणार नाही याची खात्री पटत नाही तो पर्यंत  मी हे करु नये असा डॉक्टरांनी मला सल्ला दिला.


याचबरोबर तनिषाने तिच्या पर्सनल आयुष्याविषयी मोठी खुलासा करत सांगितलं की, लग्न न करणं, रिलेशनशिपमध्ये नं राहणंच ठिक आहे. जुन्या दिवसांत माझी आजी आणि त्या दिवसातल्या महिला पुरुषांसमोर उभे राहू शकत नव्हते. माझी आई मला नेहमी सांगायची की, मुलं जन्माला घालण्यासाठी लग्नाची आवश्यकता नाही.''