मुंबई : काही वर्षांपूर्वी अभिनेत्री तनुश्री दत्ताने #Metoo मोहिमे अंतर्गत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते.  आता पुन्हा तनुश्रीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तनुश्रीने नाना पाटेकर, बॉलिवूड माफिया आणि काही पत्रकारांवर गंभीर आरोप केले आहेत. ज्यामुळे सोशल मीडियावर एकचं खळबळ माजली आहे. 'मला काहीही झालं तर त्याला फक्त आणि फक्त नाना पाटेकर, त्यांचे वकील आणि बॉलिवूड माफिया जबाबदार असतील, ' असं तनुश्री म्हणाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुढे तनुश्री म्हणते, 'बॉलिवूड माफिया कोण आहेत? त्या लोंकाची नावे सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर समोर आली. त्यांचे सिनेमे पाहू नका. त्यांच्यावर पूर्णपणे बहिष्कार टाका. इंडस्ट्रीतील काही लोकांनी आणि पत्रकारांनी माझ्याबद्दल चुकीच्या बातम्या पसरवल्या...'



'कायदा आणि न्यायव्यवस्था जरी अपयशी ठरले असले तरी माझा या महान देशाच्या लोकांवर विश्वास आहे.’' असं देखील तनुश्रीने पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे आता तनुश्रीच्या पोस्टनंतर कोणत वादळ उभं राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


दरम्यान, 2018 साली तनुश्रीने नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक छळाचा गंभीर आरोप केला. त्यानंतर सर्वचं क्षेत्रातील महिलांनी त्यांच्यावर झालेल्या अत्याचारांवर आवाज उठवला.