मुंबई: 'पिंक', 'मनमर्जिया', 'मुल्क' यांसारख्या सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारल्यानंतर अभिनेत्री तापसी पन्नू पून्हा एका मिशन साठी सज्ज झाली आहे. 'मिशन मंगल' सिनेमात  तापसीचा कोणता अंदाज चाहत्यांना अनुभवता येणार हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे. मिशन मंगल सिनेमात तापसी पन्नूसोबत खिलाड़ी अभिनेता अक्षय कुमार झळकणार आहे. 'मिशन मंगल' सिनेमाचे दिग्दर्शन राकेश धवन यांनी केले. तापसीने 'मिशन मंगल' सिनेमातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. इंन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत तापसीने कॅप्शनमध्ये लिहीले आहे.' एका सुंदर अशा प्रवासाचा शेवट झाला. कृतिका अग्रवालसाठी तयार करण्यात आलेल्या सिनेमाची शूटिंग संपली, एकाच फ्रेममध्ये एकापेक्षाएक कलाकारांचे असणे ही फार कमालीची बाब आहे.' 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


तापसी पन्नू ,अभिनेता अक्षय,विद्या बालन, सोनाक्षी सिन्हा, कृति कुल्हारी, शरमन जोशी आणि नित्या मेनेन स्टारर सिनेमा 'मिशन मंगल' 15 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. अभिनेता रणबीर कपूर अणि अभिनेत्री आलिया भट्ट स्टारर सिनेमा 'ब्रम्हास्त्र' आणि मिशन मंगल हे दोन सिनेमे एकाच दिवशी सिनेमागृहात दाखल होणार होते पण ब्रम्हास्त्र सिनेमा 25 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.


'पती पत्नी और वो' सिनेमातून तापसीला कोणत्याही प्रकारचे कारण न सांगता काढून टाकण्यात आले. तापसीने खंत व्यक्त करत कारण विचारले असता सिनेमाच्या टीमने यावर कोणत्याही प्रकारचा खुलासा केला नाही.