मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू सध्या तिच्या 'सांड की आंख' चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. 'पिंक', 'बेबी' अशा एकापेक्षा एक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्यानंतर तिच्या करिअरला चांगलीच कलाटणी मिळाली आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने चाहत्यांच्या मनात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. सेक्स कॉमेडी व्यतिरिक्त सर्व प्रकारच्या भूमिका साकारण्यासाठी मी तयार आहे, असे वक्तव्य तापसीने केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'आता पर्यंत मी अनेक सेक्स कॉमेडी चित्रपट पाहिले आहेत. मला अशा कोणत्याही चित्रपटात काम करायचे नाही. ज्यामध्ये एका महिलेला प्रकाशझोतात आणले जाईल. एखाद्या महिलेला विनोदाचा भाग करणं, तिच्यावर डबल मिनिंग विनोद करणं. हा मनोरंजनाचा भाग नाही.' असे मत तापसीने व्यक्त केले आहे. 
 
अशा प्रत्येक गोष्टींना विरोध दर्शवणाऱ्या तापसीने चित्रपटात आयटम सॉन्ग करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. 'सांड की आंख' चित्रपटानंतर ती 'थप्पड' चित्रपटात भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी अनुभव सिन्हा यांच्या खांद्यावर आहे.