मुंबई :  'तारक मेहता का उल्टा चश्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) मालिकेत नट्टू काका (Nattu Kaka) ही भूमिका साकारणारे अभिनेते घमश्याम नायक यांनी 3 ऑक्टोबर रोजी अखेरचा श्वास घेतला. नट्टू काका गेल्या काही दिवसांपासून कर्करोगाशी लढत होते. पण त्यांची ही लढाई गंभीर आजारासमोर अपयशी ठरली. दरम्यान त्यांच्या निधनापूर्वीचा फोटो टप्पू म्हणजेच राज अनादकत (Raj Anadkat)  शेअर केला आहे. फोटोमध्ये सर्वांचे लाडके नट्टू काका आनंदी दिसत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नट्टू काकांसोबत अखेरचा फोटो शेअर करत राज अनादकत म्हणाला, 'मी आणि काका मेकअप शेअर करत होतो. अनेक दिवसांनंतर ते सेटवर आले होते. त्यांनी माझ्या खोलीत प्रवेश केला आणि म्हणाले 'आव बेटा केम चे' मी त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यांनी माझ्या कुटुंबाबद्दल देखील विचारलं...'



छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकेतील 'नट्टू काका' (Nattu Kaka) ही भूमिका बजावणारे घनश्याम नायक (Ghanshyam Nayak Death) यांनी जगाचा निरोप घेतला आहे. वयाच्या 77 वर्षी त्यांचं निधन झालं आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यावर कॅन्सरवरचे उपचार सुरु होते. मात्र त्यांची कॅन्सर विरुद्धची झुंज अपयशी ठरली. 


तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेच्या माध्यमातून त्यांनी दशकापेक्षा अधिक काळ चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. या मालिकेतून ते घराघरातील प्रत्येक व्यक्तीला माहिती झाले. त्यांचं गुजराती रंगभूमीसाठीचं मोठं योगदान राहिलं आहे. त्यांनी अनेक गुजराती नाटकात काम केलं आहे.