मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah)मधील दिशा वकानी अर्थात 'दयाबेन' मालिकेत पुन्हा परतली असल्याच्या बातमीने चाहत्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे. दिशा वकानीने जवळपास दोन वर्षांनंतर मलिकेत एन्ट्री केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिपोर्ट्सनुसार, दिशाने मालिकेसाठी एक स्पेशल सीनही शूट केला आहे. सीनमध्ये ती जेठालालसोबत फोनवर बोलताना दिसतेय. 


दरम्यान, जोपर्यंत दया येणार नाही, तोपर्यंत गरबा खेळणार नसल्याच्या गोष्टीवर जेठालाल अडले असून फोनवरुन याबाबत ते सांगतात दिसतात. जेठालालच्या निराशेमुळे सर्व सोसायटीमधील सदस्यही उदास असल्याचं पाहायला मिळतंय. दिशाने जेथून मालिका सोडली होती, तेथूनच पुन्हा सुरुवात करणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे दयाबेनच्या ग्रँड एन्ट्रीकडे सर्वांचच लक्ष आहे.




२०१५ मध्ये दिशा मयूर पांड्या यांच्याशी विवाहबंधनात अडकली. त्यानंतर दिशा सप्टेंबर २०१७ पासून 'तारक मेहता...' मालिकेपासून लांब आहे. ती प्रसूती रजेवर होती. 


गेल्या अनेक दिवसांपासून दिशाने मालिका सोडल्याची चर्चा होती. पण आता दिशाने पुन्हा मालिकेत एन्ट्री केल्यामुळे या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. त्यामुळे दयाबेनच्या चाहत्यांसाठी ही मोठी आनंदाची गोष्ट ठरत आहे.