सर्वाधिक मतांनी लोकसभा जिंकणारा उमेदवार कोण माहितीये का? सर्वात कमी फरकाने विजय कोणाचा?

Lok Sabha Election Candidates Win With Lowest And Highest: लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वात कमी मतांनी जिंकणारा उमेदवार कोण तुम्हाला ठाऊक आहे का? भारतातील आतापर्यंतच्या सर्वात लोकप्रिय पंतप्रधानांपेक्षाही अधिक मतांनी जिंकणारा उमेदवार कोण आहे तुम्हाला ठाऊक आहे का? जाणून घ्या रंजक आकडेवारी...

| Jun 03, 2024, 15:04 PM IST
1/10

Lok Sabha Election Candidates

भारतामध्ये स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत 17 लोकसभा निवडणुका झाल्या आहेत. विशेष म्हणजेच प्रत्येक निवडणूक कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहिली. मात्र तुम्हाला लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक मतांनी विजयी झालेला उमेदवार आणि सर्वात कमी मतांनी विजयी झालेला उमेदवार कोण हे ठाऊक आहे का? याचसंदर्भात 2024 च्या निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात सर्वाधिक फरकाने आणि सर्वात कमी फरकाने लोकसभा निवडणूक जिंकणाऱ्या उमेदवारांचा रंजक इतिहास...

2/10

Lok Sabha Election Candidates

2014 साली भाजपाचे उमेदवार थुपस्तन चँगवांग यांनी अवघ्या 36 धावांनी विजय मिळवला होता.  

3/10

Lok Sabha Election Candidates

सर्वात कमी मताने निवडणूक जिंकणाऱ्यांमध्ये डीएमकेचे नेते एम. एस श्रीवासमी यांच्या नावाचाही समावेश आहे. त्यांनी 1971 साली लोकसभा निवडणूक 26 मतांनी जिंकली होती.  

4/10

Lok Sabha Election Candidates

सत्यजित सिंह गायकवाड हे बडोदरा मतदारसंघातून 1996 साली केवळ 17 मतांनी लोकसभा निवडणूक जिंकले होते.  

5/10

Lok Sabha Election Candidates

1989 साली कोनाथाला रामकृष्णा हे आंध्र प्रदेशमधील अनक्कापल्ली लोकसभा मतदारसंघातून 9 मतांनी निवडणूक जिंकले होते. 1988 साली राजमहाल मतदारसंघातून सोम मरांडी हे सुद्धा 9 मतांच्या फरकाने निवडून जिंकलेले. (फोटोत दिसणारे कोनाथाला रामकृष्णा)

6/10

Lok Sabha Election Candidates

काँग्रेसनेचे नेते कोनाथाला रामकृष्णा आणि त्यानंतर भाजपाचे नेते सोम मरांडी यांनी निवडणूक सर्वात कमी मताने जिंकण्याचा विक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे. (फोटोत दिसणारे सोम मरांडी)  

7/10

Lok Sabha Election Candidates

आता सर्वात कमी फरकाने निवडणूक जिंकणाऱ्या उमेदवारांबद्दल बोलायचं झालं तर 1962 ते 2019 दरम्यान 15 उमेदवार असेल आहेत जे 500 हून कमी मतांच्या अंतराने जिंकले आहेत. यापैकी दोन उमेदवार 9 मतांनी जिंकले आहेत. 

8/10

Lok Sabha Election Candidates

आतापर्यंतच्या सर्व लोकसभा निवडणुकांमध्ये सर्वाधिक मतदाधिक्याने निवडणूक जिंकणारा उमेदवार कोण असा प्रश्न विचारल्यास तुम्ही कदाचित पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव घेतलं तर तुमचं उत्तर चुकलंय.

9/10

Lok Sabha Election Candidates

मात्र तुम्हाला मोदी हे सर्वाधिक मतांनी जिंकणारे उमेदवार वाटत असतील तर तुमचं हे उत्तर चुकीचं ठरेल. तुमचा विश्वास बसणार नाही पण मोदींपेक्षाही अधिक मताधिक्याने निवडणूक जिंकून लोकसभेत जाणारा खासदार हा गुजरातमधला आहे.  

10/10

Lok Sabha Election Candidates

गुजरातमधील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सी. आर. पाटील हे 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये तब्बल 6 लाख 89 हजार 668 मतांच्या फरकाने जिंकून आले होते. हा भारताच्या लोकसभा निवडणुकीच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय आहे.