Taarak Mehta Ka Ooltah Chashma Cast Fees: तारक मेहता का उलटा चष्मा ही मालिका गेली 14 वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करते आहे. ही मालिका आपल्या सगळ्यांना खूप आवडते. या कार्यक्रमातील सर्वच पात्र ही भारतीय प्रेक्षकांच्या घराघरात पोहचली आहे. हा एकमेव असा शो आहे जो लहान मुलांनाच नाही तर मोठ्यांनाही पाहायला आवडतो. या शोचं स्वत:च असं एक फॅन फॉलोइंग आहे. (tarak mehta ka ooltah chashma cast fees per episode)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तारक मेहताच्या कलाकारांबद्दल सगळेच जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. पण तुम्हाला ही एक गोष्ट माहितीये का की हे स्टार कलाकार आपल्या एका एपिसोडसाठी किती फी घेतात ते? तेव्हा जाणून घेऊया जेठालाल, शैलेश लोढा आणि मुनमुन दत्ता यांसारख्या स्टार्सची फी किती आहे ते. 


आणखी वाचा - आई नीतू कपूरनं Ranbir चा फोटो शेअर करतानाच नेटकरी म्हणाले...


शोमध्ये जेठालालची भूमिका साकारणाऱ्या दिलीप जोशीची फी सर्वाधिक आहे. त्याला प्रत्येक एपिसोडसाठी 1.5 लाख रुपये मिळतात. प्रत्येक एपिसोडसाठी तारक मेहताच्या भूमिकेत दिसणारे शैलेश लोढा यांचे नाव सर्वाधिक मानधन घेणाऱ्या स्टार्समध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. शैलेशला एका एपिसोडसाठी 1 लाख रुपये मिळतात. पण आजकाल त्यानं शो सोडल्यामुळे सगळकडेच त्याच्याच चर्चे आहेत. 


शोमध्ये बबिताची भूमिका करणाऱ्या मुनमुन दत्ताबद्दल ऐकले आहे की तिला प्रत्येक एपिसोडसाठी 35-50 हजार रुपये मिळतात तर 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मध्‍ये जेठालालचे वडील अर्थात बाबूजींची भूमिका करणारे अभिनेते अमित भट्ट प्रत्येक एपिसोडसाठी 70 ते 80 हजार रुपये मिळतात. बबिता जीच्या पतीची म्हणजेच अय्यरची भूमिका करणाऱ्या तनुज महाशब्देला प्रति एपिसोड 80 हजार रुपये दिले जातात.


आणखी वाचा - करीना, विद्या बालनसोबत जुळलं नाव, पण अभिनेत्याने अरेंज मॅरेज करत सगळ्यांनाच दिला धक्का


आत्माराम तुकाराम भिडे म्हणजेच मंदार चंदावरकर पर एपिसोड 80,000 रुपये घेतात. अंजली भाभीची भूमिका करणारी अभिनेत्री सुनैना फौजदार हिला प्रत्येक एपिसोडसाठी 25 हजार रुपये मिळतात. पत्रकार पोपटलाल म्हणजेच श्याम पाठक यांना प्रत्येक एपिसोडसाठी 60 हजार रूपये मिळतात.