मुंबई : लोकप्रिय कॉमेडी शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ने 10 वर्षे पूर्ण केली आहेत. मात्र हा आनंद शोच्या कलाकारांनी साजरा केला नाही कारण काही दिवसांपूर्वीच मालिकेतील डॉ हाथी हे कॅरेक्टर साकारणाऱ्या कवि कुमार यांच निधन झालं होतं. या दरम्यानच या मालिकेतील लोकप्रिय व्यक्ती नट्टू काका यांनी सर्वात मोठा खुलासा केला आहे. ज्यामुळे तुम्ही देखील हैराण व्हाल 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डॉ हाथी यांच्या निधनाच्या बातमीमुळे मालिकेतील सर्व कलाकारांना मोठा झटका बसला होता. डॉ हाथी यांच्या निधनानंतर टीआरपीमध्ये देखील मोठा बदल पाहायला मिळाला. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेने 28 जुलै रोजी 10 वर्षे पूर्ण केली. 


नट्टू काकांनी केला मोठा खुलासा 


या मालिकेतील नट्टू काकाचं कॅरेक्टर प्ले करणारा अभिनेता घनश्याम नायक यांनी खूप मोठा खुलासा केला आहे. घनश्याम नायक यांनी सांगितलं की, तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेने डिप्रेशनमध्ये असलेल्या दर्शकाचा जीव वाचवला आहे. मी एका अशा व्यक्तीला ओळखतो जो आत्महत्या करायला जाणार होता मात्र या मालिकेमुळे त्याने तो विचार बाजूला ठेवला. यानंतर त्यांनी सांगितलं की, तारक मेहताच्या एका एपिसोडने त्या माणसाचा जीव वाचवला. आणि जगण्याची नवी उमेद दिली.