मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. लोकांना खळखळून हसवण्याचं काम ही मालिका करत आहे. यातील प्रत्येक पात्र आता घराघरात पोहोचलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यातच या मालिकेतील बबिता जी म्हणजेच अभिनेत्री मुनमुन दत्ता तिच्या बोल्ड अंदाजामुळे चांगलीच चर्चेत असते. ती सोशल मीडियावर देखील कमालीची अॅक्टीव्ह असते. नवनवीन फोटो आणि व्हिडिओ ती चाहत्यांसाठी शेअर करताना दिसते.


सोशल मीडियावर तिचं मोठं फॅन फॉलोविंग आहे. नुकताच तिने आईसोबतचा एक खास फोटो शेअर केला आहे.काही दिवसांपूर्वी बबिता आणि टप्पू हे रिलेशनशीपमध्ये असल्याची चर्चा आहे. त्यानंतर दोघांनी एक नोट शेअर करत अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर आता ती आईसोबतच्या नव्या फोटोमुळे चर्चेत आहे.



बबिताचा सुंदर फोटो


'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये बबिता जीची भूमिका साकारुन प्रसिद्ध झालेली मुनमुन दत्ता अनेकदा तिचे बोल्ड आणि सुंदर फोटो शेअर करत असते. मात्र आज अभिनेत्रीच्या आईच्या फोटोंनी लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. मुनमुनने आपल्या इन्स्टाग्रामवर वेगवेगळे पोज देत फोटो शेअर केले आहेत. 



बबिताची आई सौंदर्यावती


या फोटोंमध्ये मुनमुनने आईसोबतचा एक फोटोही शेअर केला आहे. पीच रंगाची बनारसी साडी नेसलेली मुनमुनची आई खूप सुंदर आणि रुबाबदार दिसत आहे. मुनमुन तिच्या आईसोबत वेळ घालवाताना दिसत आहे.या फोटोत आई-मुलीचे बॉन्डिंगही दिसत आहे.